Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 हजार पगारात घर कसं चालतं? Security Guardचा महिन्याचा हिशोब वाचून 1 लाख पगारवाल्यांची पण डोळे उघडतील

Security Guard महागाई आणि वाढत्या खर्चामुळे चांगला पगार असूनही अनेकांना बचत करणे कठीण जात आहे. अशातच महिन्याला अवघे 18 हजार रुपये पगार मिळवणाऱ्या एका सिक्युरिटी गार्डचा खर्चाचा हिशेब सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 13, 2026 | 11:21 AM
Security Guard (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Security Guard (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 18 हजार पगारात सिक्युरिटी गार्डचा संसाराचा हिशेब!
  • घरखर्च, मुलांचं शिक्षण सांभाळून महिन्याला 2 हजारांची बचत!
  • व्हायरल पोस्टमुळे कमी पगारात बचतीची चर्चा सुरू!

सध्या सगळ्यांचंच तेच म्हणणं आहे, महागाई वाढली, पगार पुरत नाही. 50 हजार कमावणारा पण म्हणतो, महिना कसा जातो कळत नाही. 1 लाख पगार असणारा पण म्हणतो, हातात काहीच राहत नाही. सेव्हिंग करायची कशी, खर्च कुठे कमी करायचा, हेच कळत नाही. परंतू अवघ्या 18 हजारांच्या नोकरीत एक सिक्योरुटी गार्ड आपलं घर कसं चालवतो? हे ऐकून तुमचीही पगाराकडे पाहण्याची नजर बदलेल. हे आपल्यालाही शक्य आहे, असं तुम्ही म्हणालं. खरंच, 18 हजारात घर चालवणं म्हणजे काय, हे त्या गार्डचा हिशेब बघितल्यावर कळेल.

व्हायरल पोस्टमुळे चर्चा

महिन्याला 18 हजार रुपये पगार मिळत असेल तर घरखर्च भागवून किती पैसे शिल्लक राहतील? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.अंकित पांडे नावाच्या एका माणसाने X वर एक पोस्ट टाकली. त्याने एका सिक्युरिटी गार्डशी Security Guard गप्पा मारल्या होत्या. त्या गार्डने त्याला आपल्या महिन्याचा पूर्ण हिशेब सांगितला. किती कमावतो, कुठे किती खर्च होतो, शेवटी हातात किती राहतात. अंकितने तो हिशेब जसाच्या तसा पोस्ट केला. आणि ती पोस्ट व्हायरल झाली. लोक म्हणायला लागले, यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतंय.

18 हजारात घर कसं चालतं?

संबंधित सुरक्षा रक्षकाला दरमहा 18 हजार रुपये पगार मिळतो. मात्र घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण आणि औषधांचा खर्च भागवल्यानंतर त्याच्या हातात केवळ दोन हजार रुपये उरतात. 18 हजार पगार त्यात घर चालवायचं, मुलं शिकवायची, घरभाडं द्यायचं. तरी तो माणूस महिन्याला 2 हजार रुपये वाचवतो. हे ऐकूनच अनेकांना धक्का बसला. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कमी पगारात घर चालवणाऱ्या लोकांच्या अडचणींवर चर्चा सुरू झाली.

ISRO मध्ये मेगा भरती! 10वी पास ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना सुवर्णसंधी; पात्रता, पगार अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

सगळ्यात जास्त पैसा जातो जेवणावर

या सुरक्षा रक्षकाच्या महिन्याच्या खर्चात सर्वाधिक रक्कम अन्नधान्य आणि जेवणासाठी जाते. त्यासाठी दरमहा सहा हजार रुपये खर्च होतात. त्याच्या हिशेबात बघा. जेवणासाठी, किराण्यासाठी महिन्याला 6 हजार रुपये जातात. घरभाड्यासाठी 4 हजार रुपये जातात. म्हणजे फक्त या दोन गोष्टींवरच 10 हजार रुपये संपतात. पगाराच्या निम्म्याहून जास्त पैसा इथेच जातो.

याशिवाय मुलांच्या शाळेच्या फीसाठी 2 हजार रुपये जातात. मुलांना शिकवायचं पण आहे, घर पण चालवायचं आहे. या दोन्ही गोष्टी सांभाळताना पगाराचा मोठा भाग संपतो, हे या हिशेबातून दिसतंय.

प्रवास, लाईट बिल, औषधं, घरभाडे आणि किराण्या

व्यतिरिक्त प्रवासासाठी दरमहा दोन हजार रुपये खर्च होतात.कामावर जायला-यायला बसचं, ट्रेनचं भाडं लागतं. त्यासाठी महिन्याला 2 हजार रुपये जातात. घरातलं लाईट बिल आणि इतर बिलांसाठी 1 हजार रुपये जातात. आणि औषधांसाठी अजून 1 हजार रुपये जातात. घरात कोणी आजारी पडलं तर औषधं घ्यावीच लागतात.असा सगळा हिशेब केला तर त्याचा महिन्याचा खर्च 16 हजार रुपये होतो. 18 हजार पगारातून 16 हजार खर्च वजा केले तर हातात फक्त 2 हजार रुपये राहतात. म्हणजे कमाईच्या जवळपास 89 टक्के पैसा फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या गरजांवर खर्च होतो. चैन करायला, हॉटेलला जायला, फिरायला जायला पैसाच उरत नाही.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

2 हजारांची बचत टिकणार का?

या पोस्टवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.काही लोकांनी त्या गार्डचं कौतुक केलंय. म्हणाले, 18 हजारात पण 2 हजार वाचवतो, हेच खूप मोठं आहे. पण काही लोकांनी दुसरा प्रश्न विचारला. ही बचत किती दिवस टिकेल? घरात अचानक कोणी आजारी पडलं, मुलांच्या शाळेत जास्तीची फी मागितली, घरातला पंखा, टीव्ही बिघडला, तर हे 2 हजार लगेच संपून जातील. म्हणजे महिन्याच्या शेवटी पैसे उरले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं नाही. ही चर्चा नेटकरी करतायत.

कमी पगारात भविष्याचं काय?

या पोस्टमुळे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांसारख्या कमी वेतनावर काम करणाऱ्या वर्गाच्या आर्थिक अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये घरभाडे, प्रवास आणि शिक्षणाचा खर्च लक्षात घेता कमी उत्पन्नात बचत करणे आणखी कठीण ठरू शकते.

खरंच विचार करा. मुंबईत 4 हजारात खोली मिळणं पण अवघड आहे. पण तो माणूस 4 हजारात भाडं देतो, 6 हजारात घर चालवतो, मुलांना शिकवतो. आपण 50 हजार, 1 लाख कमावून पण महिना संपायच्या आधी खिसा रिकामा होतो, असं म्हणतो. फरक पगारात नाही, फरक हिशेब ठेवण्यात आहे.त्या गार्डकडे हिशेब आहे. कुठे किती जायचं, हे त्याला माहितीये. म्हणून तो 2 हजार वाचवू शकतो. आपण मात्र विनाकारण खर्च करतो. आणि मग पगार कमी आहे, असं म्हणतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिक्युरिटी गार्डला महिन्याला किती पगार मिळतो?

    Ans: संबंधित सिक्युरिटी गार्डला दरमहा 18 हजार रुपये पगार मिळतो.

  • Que: 18 हजार रुपयांच्या पगारातून सिक्युरिटी गार्ड किती बचत करतो?

    Ans: सर्व खर्च भागवल्यानंतर तो दरमहा 2 हजार रुपये वाचवतो.

  • Que: सिक्युरिटी गार्डचा सर्वाधिक खर्च कशावर होतो?

    Ans: त्याचा सर्वाधिक म्हणजे 6 हजार रुपये खर्च जेवण आणि किराणा सामानावर होतो.

Web Title: Security guard 18000 salary monthly expenses 2000 savings viral post rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 11:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.