फोटो सौजन्य - Social Media
रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसने अनेक अंतर्गत रिक्त जागांना भरण्यासाठी भरती प्रक्रियेस सुरूवात केली आहे. या भरती प्रक्रियेत इंडिविजुअल कंसल्टेंट पदाच्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे देशात रोजगाराच्या संध्या निर्माण होणार आहेत. रोजगारचं शोधात असणारे युवा या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. या रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी रिट्सच्या rites.com या ऑफिशिअल लिंकवर भेट द्यावी. उमेदवारांना सप्टेंबरच्या ५ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इंडिविजुअल कंसल्टेंट पदाचे ११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवासी अभियंता, वरिष्ठ नियोजन आणि वेळापत्रक विशेषज्ञ, निवासी अभियंता पदांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : DDA ने परीक्षा शेड्युल केले जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरु ASO, JSA स्टेज-२ परीक्षा
या भरती प्रक्रियेत वयोमर्यादेविषयी अट पाहायला मिळत आहे. एकंदरीत, ग्रुप जनरल मॅनेजरच्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे कमाल वय ५३ वर्षे असावे. तर डिप्टी मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४१ वर्षे असणे आवश्यक आहे. विशेष म्हणेज अर्ज करतेवेळी उमेदवारांना ६०० रुपयांचे भुगतान करावे लागणार आहे. उमेदवारांना अर्जशुल्काची रक्कम ऑनलाईन स्वरूपात डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंगने भरता येईल.
सदर भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमाह वेतन ७० हजारांपासून ते ८० हजार मिळण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेत शिक्षणासंबंधित अट पाह्यला मिळत आहे. उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य असणार आहे. उमेदवार एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/पीजीडीएम/पीजीडीएचआरएम डिग्रीतून पदवीधार असावा. ग्रुप जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवाराकडे २३ वर्षांचे अनुभव असणे गरजेचे आहे. तर डेप्युटी मॅनेजर पदी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान ११ वारशाचे अनुभव असणे फार गरजेचे आहे.
अशा प्रकारे भरता येईल फॉर्म: