फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली विकास प्राधिकरण ( DDA ) ने असिस्टंट सेक्शन ऑफिसर ( ASO ) तसेच ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट ( JSA ) च्या पदासाठी भरती पार्करफिया योजल्या होत्या. या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. अर्ज करण्याची मुदत संपली असून निवड प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. दरम्यान, DDA ने एएसओ तसेच जेएसए पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित केली आहे. ASO तसेच JSA स्टेज २ परीक्षा, २८ सप्टेंबर तसेच २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे परीक्षा २ पाळ्यांमध्ये घेतलीय जाणार आहे. परीक्षेतील पहिला सेशन सकाळी ९ ते सकाळी ११:१५ वाजेपर्यंत असेल. तर दुसरा सेशन दुपारी २:०० वाजल्यापासून ते दुपारचे ३:०० वाजेपर्यंत असणार.
हे देखील वाचा : गेट परीक्षा उत्तीर्ण केलीये, पण पुढे काय? जाणून घ्या करिअर पर्याय
विशेष म्हणजे या परीक्षेसाठी एकूण ७००३ विद्यार्थ्यांना नेमले गेले आहे. या विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी उपस्थित राहता येणार आहे. या परीक्षेचे संपूर्ण शेड्युल तसेच परीक्षेसंदर्भातील संपूर्ण माहिती DDA च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच DDA च्या dda.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही पाहता येणार आहे. परीक्षेच्या ३ दिवसांगोदर प्रवेशपत्र जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात DDA ने अधिसूचना जाहीर केली आहे.
DDA ने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद आहे कि सदर भारतीय प्रक्रिया सहायक विभाग अधिकारी आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी असून एकूण ६८७ पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. स्टेज २ परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले गेलेल्या उमेदवारांची यादी १८ मार्च २०२४ तसचे १९ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेसंबंधित संपूर्ण माहिती DDA च्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येणार आहे. परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी या माहितीचा काळजीपूर्वक आढावा घ्यावा.
अशा प्रकारे परीक्षा शेड्युल करता येईल डाउनलोड