परदेशामध्ये गेलेल्या भारतीयासंबंधी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हजारो भारतीय विद्यार्थी, कॅनडातील तंदूरी फ्लेम नावाच्या रेस्टॉरंटच्या बाहेर नोकरीच्या मुलाखतीसाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. वेटर आणि अन्य सेवा कर्मचारी यासाठी या रेस्टॉरंटमध्ये भरतीप्रक्रिया सुरु असून यासाठी हजारो विद्यार्थी याकरिता रांगेत उभे आहेत. त्यामुळे कॅनडामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा संघर्ष समोर येत आहे.
@MeghUpdates नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, “ब्रॅम्प्टनमध्ये नवीन रेस्टॉरंट उघडण्याच्या जाहिरातीनंतर 3000 विद्यार्थी (बहुतेक भारतीय) वेटर आणि नोकराच्या नोकरीसाठी रांगेत उभे असताना कॅनडातील भितीदायक दृश्ये. ट्रूडोच्या कॅनडामध्ये प्रचंड बेरोजगारी? गुलाबी स्वप्ने घेऊन भारत सोडून कॅनडाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गंभीर आत्मपरीक्षणाची गरज आहे!
या व्हिडिओवर भारतामध्ये संतप्त प्रतिक्रिया
या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सच्या अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामध्ये एका युर्जसने लिहिले आहे की, “ब्रॅम्प्टनमध्ये वेटर आणि नोकरांच्या नोकऱ्यांसाठी 3,000 विद्यार्थी, प्रामुख्याने भारतीय, रांगेत थांबलेले पाहणे चिंताजनक आहे. हे ट्रूडोच्या कॅनडामधील बेरोजगारीचे कठोर वास्तव प्रतिबिंबित करते. स्वप्नांसाठी भारत सोडून जाणाऱ्यांना गंभीर वास्तव तपासण्याची गरज आहे!”
एका युजर्सने म्हटले आहे की, तिकडे जाऊ नका, कॅनडा सध्या गरीब देश आहे.चला मित्रांनो, या आणि आपला देश समृद्ध करा, तुम्ही सर्वजण अधिक पात्र आहात.एका युजर्सने विद्यार्थ्यांचा बचाव केला, त्याने म्हटले आहे की, रेस्टॉरंटमध्ये अर्धवेळ काम करणे ही बऱ्याच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सामान्य गोष्ट आहे. मनोज गिरी नावाच्या युजर्सने आपल्या मित्राबद्दल लिहिताना म्हटले आहे की, ही वस्तुस्थिती आहे. माझा एक मित्र जो एमबीए आहे आणि दर्जेदार कामाचा अनुभव आहे तो चांगल्या नोकरीच्या संधींसाठी कॅनडाला गेला आणि तिथे दीड वर्ष राहिल्यानंतर परत आला.
वेटर आणि अन्य सेवा कर्मचारीच्या नोकरीसाठी इतकी गर्दी पाहून भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळविणे सध्या कठीण झाले आहे. सामान्यत: परदेशामध्ये पार्ट टाईम जॉब करुन भारतीय विद्यार्थी शिक्षण आणि आपला उदरनिर्वाह करतात. मात्र सध्या कॅनडामधील ही भयानक स्थिती पाहून भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशी येण्याचा सल्लाच अनेक सोशल मीडिया युजर्सकडून दिला जात आहे.