फोटो सौजन्य - Social Media
संगीत, सिनेमा, टेलिव्हिजन, रेडिओ, वेब सीरिज किंवा गेमिंग या सर्व माध्यमांमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, ती म्हणजे Sound Quality. ही गुणवत्ता योग्य प्रकारे सादर करण्यामागे साउंड इंजिनिअरचा मोठा वाटा असतो. साउंड इंजिनिअरिंग हे एक तांत्रिक अन् क्रिएटिव्ह क्षेत्र आहे, जे म्युझिक आणि ऑडिओ प्रोडक्शनमध्ये आवश्यक भूमिका बजावते. साउंड इंजिनिअरिंगमध्ये आवाजाची रेकॉर्डिंग, मिक्सिंग, एडिटिंग आणि मास्टरिंग केली जाते. हे काम स्टुडिओ, लाईव्ह कॉन्सर्ट, फिल्म किंवा रेडिओसाठी केले जाऊ शकते. साउंड इंजिनिअर म्युझिक कंपोझर किंवा डिरेक्टरच्या सूचनांनुसार विविध साउंड इफेक्ट्स आणि व्हॉईस क्लिप्स एकत्र करून अंतिम ऑडिओ तयार करतो.
साउंड इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी १२वी नंतर सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स कोणतीही शाखा चालते. त्यानंतर डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा डिग्री कोर्स करता येतो. जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे आहे तर Diploma in Sound Engineering, B.Sc. in Sound Engineering तसेच Certificate in Audio Production हे कोर्सेस करू शकतात. भारतामध्ये FTII पुणे, SAE Institute, AAFT नोएडा, Whistling Woods मुंबई, Seamedu पुणे यासारख्या संस्थांमध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी अंगी काही कौशल्य असणे गरजेचे आहे. यासाठी साउंड आणि म्युझिकची समज असणे आवश्यक आहे. टेक्निकल ज्ञान (DAW सॉफ्टवेअर, मिक्सिंग कन्सोल्स) असणे आवश्यक आहे. क्रिएटिव्ह विचार करणे गरजेचे आहे. तसेच टीमवर्क आणि कम्युनिकेशन स्किल्स असणे गरजेचे आहे.
साउंड इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेतल्यास म्युझिक स्टुडिओ, फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री, रेडिओ चॅनेल्स, वेब सीरिज / OTT प्लॅटफॉर्म तसेच विविध गेमिंग कंपन्यांमध्ये काम करता येऊ शकते. लाईव्ह कॉन्सर्टमध्येही साऊंड इंजिनिअरची गरज भासते. नवख्या साउंड इंजिनिअरला सुरुवातीस 15,000 ते 25,000 रुपये मासिक पगार मिळतो. अनुभव वाढल्यास हे उत्पन्न लाखांपर्यंत जाऊ शकते. फ्रीलान्स प्रोजेक्ट्समधूनही चांगली कमाई होते. साउंड इंजिनिअरिंग हे केवळ एक करिअर नाही, तर संगीताची गुणवत्ता आणि अनुभव उंचावणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. योग्य कौशल्य, सराव आणि शिक्षण घेऊन या क्षेत्रात मोठे यश मिळवता येते.