कुडाळमध्ये नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ, लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एखादी कला आपल्याला आनंद देते ती कला मनापासून शिका तिचा मनमुराद आनंद घ्या, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते प्रणव रावराणे यांनी केले. संकल्प क्रिएशन कुडाळ या संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज संगीत “वस्त्रहरण” नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत कुडाळ येथे झाला. त्यावेळी प्रणव रावराणे बोलत होते. या शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २० मे रोजी या शिबिराची सांगता होणार आहे.
‘हिंदीचे कलाकार घेऊन सिनेमा डब करून पॅन इंडिया ठरत नाही….’, प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य
कुडाळच्या संकल्प क्रिएशन डान्स अकादमीच्या वतीने आजपासून नृत्य प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचे उदघाटन ‘वेतोबा’ फेम अभिनेते उमाकांत पाटील यांच्या हस्ते नटराज पूजन करून झाले. यावेळी “संगीत वस्त्रहरण” नाटकांच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले या नाटकातील कलाकार प्रणव रावराणे, मुकेश जाधव, राजेश भोसले, सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव, रंगकर्मी निलेश उर्फ बंड्या जोशी उपस्थित होते. संकल्प क्रिएशनचे भूषण बाक्रे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून भूषण बाक्रे यांनी शिबीरामागची भूमिका आणि शिबीर कसे चालणार आहे याची माहिती दिली.
सोनी लिव्ह लवकरच घेऊन येणार धक्कादायक वेब सिरीज, ‘कानखजुरा’ चित्रपटाचा टीझर रिलीज!
२० मेपर्यंत रोज सायंकाळी ३ ते ६ या वेळात हे नृत्य प्रशिक्षण शिबीर होणार आहे. त्यांनतर २० मे रोजी शिबिरार्थींचा सहभाग असलेला कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे बाक्रे यांनी सांगितले. सर्व उपस्थित पाहुण्यांच्या वतीने अभिनेता प्रणव रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. “कला ही माणसाला कसे जगायचे हे शिकवते, या पु. ल. देशपांडे यांच्या उद्गारांची आठवण करून देत त्यांनी प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संकल्प क्रिएशनच्या अदिती दळवी, सानिका कुडतरकर, योगेश शर्मा आणि इतर कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन भूषण बाक्रे यांनी केले. यावेळी सुमारे ५० शिबिरार्थी, तसेच पालक उपस्थित होते. दरम्यान, “वस्त्रहरण” नाटकातील या कलाकारांनी नेरुरच्या श्री देव कलेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन देखील घेतले.