फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विद्या भवनचे एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SPJIMR)ने पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (PGPDM) बॅच २५ साठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. या प्रोग्राममध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा काम करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना सहभागी होण्याची संधी मिळते. भारतातील हा एकमेव विकास व्यवस्थापनाचा प्रोग्राम आहे ज्याला आंतरराष्ट्रीय मान्यता (AMBA आणि AACSB) मिळाली आहे. १२ महिन्यांचा हा मॉड्युलर प्रोग्राम सहभागींना शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यावहारिक अनुभव यांचे अद्वितीय संयोजन देतो.
हे देखील वाचा : पंजाब सिंध बँकेमध्ये अप्रेंटिसशिपच्या 100 जांगासाठी भरती ! तरुणांनी तात्काळ करा अर्ज
प्रोग्रामचे अध्यक्ष, प्रो. तनोजकुमार मेश्राम यांनी नुकतेच पॅनेलमध्ये ‘भारतातील सीएसआर व एनजीओंसाठी आव्हानांचा सामना करताना’ विषयावर चर्चा केली, जेथे त्यांनी वाढत्या सीएसआर फंडचा पुरेपूर वापर करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात क्षमता निर्मितीप्रती गरज व्यक्त केली. सध्या हा फंड वार्षिक जवळपास ३०,००० कोटी रूपये आहे. ते पुढे म्हणाले, ”पण, सामाजिक क्षेत्रात कौशल्य विकासाला गती मिळालेली नाही, ज्यामुळे अपेक्षा व निष्पत्तींमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.”
एसपीजेआयएमआर पीजीपीडीएमचा ही तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे. २०११ पासून या प्रोग्रामने भारतातील २६ राज्यांमधील ३५० हून अधिक कंपन्यांमध्ये अनुकूल परिणाम घडवून आणला आहे. पीजीपीडीएमचे माजी विद्यार्थी विविध सामाजिक संस्थांचे संस्थापक, सीएसआर व्यवस्थापक, सामाजिक उद्योजक, प्रोग्राम अधिकारी आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. हा प्रोग्राम सहभागींना समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि तंत्रज्ञान प्रदान करतो.
हे देखील वाचा : AI मुळे नोकऱ्यांवर येत आहे गदा ! मात्र ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांवर होणार नाही कोणताही परिणाम
पात्रता आणि निवड प्रक्रिया
• मान्यताकृत युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
• किमान दोन वर्षांचा संबंधित पूर्ण-वेळ कामाचा अनुभव असावा.
• संगणकामध्ये मुलभूत प्राविण्य असावे, तसेच शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले पाहिजे.
• फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
• प्रायोजित उमेदवारांनी अर्जासोबत प्रायोजक संस्थेचे समर्थन पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
अधिक तपशील आणि अर्जासंदर्भातील माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाइटला (website) भेट द्या किंवा प्रोग्राम टीमला ०२२-६२१३४४४४ या क्रमांकावर संपर्क साधा किंवा admissions.pgpdm@spjimr.org इथे ईमेल करा आणि दीर्घकालीन सामाजिक परिणाम घडवून आणण्याच्या प्रवासाच्या दिशेने पाऊल उचला.