
फोटो सौजन्य - Social Media
मेहनत आणि योग्य निर्णय घेतल्यास यश मिळवण्यासाठी मोठ्या कॉलेजचं नाव आवश्यक नसतं, (IIT) हे एका ३२ वर्षांच्या आयटी इंजिनियरने सिद्ध केलं आहे. ना तो IIT मधून शिकलेला, ना मोठ्या शहरातून आलेला. पण आज त्याचा वार्षिक पगार तब्बल ₹1.03 कोटी आहे. त्याने ही वाटचाल फक्त ₹4.8 लाखांच्या सुरुवातीच्या पगारापासून सुरू केली होती. त्याने हे ध्येय कसे मिळवले जाणून घेयूआत त्याच्या यशोगाथेतून.
२०१५ मध्ये बंगळुरूमध्ये एका छोट्या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या इंजिनियरने कमी पगार असूनही मेहनत आणि बचतीवर भर दिला. २०१७ मध्ये त्याला IIM मध्ये एमबीए प्रवेश मिळाला आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडला.
एमबीए पूर्ण केल्यानंतर त्याला १७ लाखांची नोकरी मिळाली, परंतु कंपनीच्या रीस्ट्रक्चरिंगमुळे ती नोकरी गमवावी लागली. मात्र त्याने हार मानली नाही. २०२१ मध्ये एका प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीत तो रुजू झाला आणि पगार वाढून ₹२२ लाख झाला. पुढे २०२३ मध्ये त्याने एका SaaS कंपनीत रिमोट वर्क स्वीकारले, ज्यात ₹३१ लाखांचा फिक्स पगार आणि ₹१२ लाखांचा बोनस मिळाला. मेहनतीमुळे २०२४ मध्ये पगार ₹४१ लाखांपर्यंत पोहोचला आणि अखेर २०२५ मध्ये तो प्रिन्सिपल प्रोग्राम मॅनेजर झाला, ज्यासाठी त्याला तब्बल ₹१.०३ कोटींचा पॅकेज मिळाला.
इतक्या मोठ्या यशानंतरही तो आजही साधं जीवन जगतो. २०१५ मध्ये घेतलेलीच बाइक वापरतो, ना आलिशान घर, ना चैनीची सवय. त्याची पत्नी स्वतःची डिझाईन एजन्सी सुरू करत आहे. या इंजिनियरची कथा हे सिद्ध करते की यशासाठी ना मोठं कॉलेज लागतं, ना मोठं शहर फक्त मेहनत, शिकण्याची तयारी आणि योग्य निर्णय घेतले की कोणीही कोट्यधीश होऊ शकतो.