फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), गोरखपूर येथे नॉन-फॅकल्टी पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. स्कोअर कीपर, टेक्निकल असिस्टंट (ENT), टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे. एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे, 10वी पास उमेदवारांनाही काही पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in
शैक्षणिक पात्रत निश्चित करण्यात आली आहे. पदांनुसार उमेदवारांकडे B.Sc. (Nursing), Graduation / Commerce Graduate / Post Graduate, Diploma in Material Management, 10+2 (Science), B.Sc. (Radiography / Radiotherapy / Ophthalmic Techniques) तसेच Pharmacy मध्ये Diploma असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी फक्त 10वी पास असलेले उमेदवारही पात्र आहेत. काही ठिकाणी अनुभव आणि मेडिकल डिग्रीशिवायही अर्ज करता येईल. किमान वय 18 वर्ष, तर पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या टप्प्यांतून केली जाईल. लिखित परीक्षेत पात्र होण्यासाठी अनारक्षित/ईडब्ल्यूएस वर्गासाठी किमान गुण 40% असणे आवश्यक आहे. OBC प्रवर्गासाठी 35% असणे आवश्यक आहे. एससी/एसटी पदासाठी 30% असणे आवश्यक आहे.
पगार श्रेणी पाहिली तर पदानुसार वेतन लेव्हल 01 ते लेव्हल 10 पर्यंत असेल.
अर्ज कसा करावा:
अर्ज शुल्क:
अनारक्षित/ओबीसी: ₹1770
एससी/एसटी/ईडब्ल्यूएस: ₹1416
एम्स गोरखपूरमधील ही भरती वैद्यकीय तसेच नॉन-टेक्निकल पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी शेवटची तारीख चुकवू नये.






