Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला ‘म्युकस पॅराडॉक्स’

आयआयटी मुंबईच्या नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, प्रदूषणाच्या सततच्या संपर्कामुळे श्वसनमार्गांमध्ये श्लेष्माचे प्रमाण वाढले तर संरक्षण मजबूत होण्याऐवजी ते कमकुवत ठरते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 14, 2026 | 05:28 PM
फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते

Follow Us
Follow Us:

राम खांदारे, मुंबई : प्रदूषणापासून फुफ्फुसांचे संरक्षण करणारा श्लेष्म (म्युकस) जास्त प्रमाणात साचल्यास उलट धोका वाढतो आणि दमा व अ‍ॅलर्जीचे झटके तीव्र होऊ शकतात, असे महत्त्वाचे संशोधन आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी काढला आहे. मुंबईतील सततच्या प्रदूषण पार्श्वभूमीवर या अभ्यासामुळे श्वसनमार्गांतील आजारांची कारणमीमांसा स्पष्ट होत असून भविष्यातील औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना नवी दिशा मिळण्याची मोठी शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान आपल्या फुफ्फुसांतील श्वसनमार्गांमध्ये नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणून श्लेष्म (म्युकस) सतत स्रवत असतो. बाहेरील सूक्ष्म कण, धूळ, काजळी किंवा अ‍ॅलर्जेन आत शिरताच हा श्लेष्म त्यांना पकडून ठेवतो. मात्र आयआयटी मुंबईच्या नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, प्रदूषणाच्या सततच्या संपर्कामुळे श्वसनमार्गांमध्ये श्लेष्माचे प्रमाण वाढले तर संरक्षण मजबूत होण्याऐवजी ते कमकुवत ठरते.
संशोधकांच्या अभ्यासात असे आढळून आले की अतिरिक्त श्लेष्म श्वसनमार्गांमध्ये सलग आवरण तयार करत नाही, तर ठिकठिकाणी अरुंद उंचवटे आणि गुठळ्या निर्माण होतात. परिणामी काही भाग पूर्णपणे उघडे राहतात. या उघड्या भागांवर अतिसूक्ष्म प्रदूषणकण साचण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे दमा, अ‍ॅलर्जी व इतर श्वसनविकारांचा धोका अधिक होतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईचे संशोधक स्वर्णादित्य हाजरा आणि प्रा. जेसन आर. पिकार्डो यांनी केला असून त्यांचा शोधनिबंध जर्नल ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

संशोधन प्रामुख्याने ‘मध्य श्वसनमार्गां’वर केंद्रित आहे. हे मार्ग श्वासनलिका आणि फुफ्फुसांतील शेवटच्या वायूकोशांदरम्यान असतात. या भागात श्लेष्माचे आवरण भौतिकशास्त्रीयदृष्ट्या ‘रेली–प्लॅटो अस्थैर्य’ या सिद्धांतानुसार वर्तन करते. त्यामुळे श्लेष्म एकसंध न राहता ठिकठिकाणी गोळा होतो आणि संरक्षणात खंड पडतो.

“साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते. त्यामुळे श्वसनमार्गांचे काही भाग उघडे पडतात आणि अतिसूक्ष्म प्रदूषणकण सहजपणे आत शिरू शकतात. हा खरा ‘म्युकस पॅराडॉक्स’ आहे.” आयआयटी मुंबईचे प्रा. जेसन आर. पिकार्डो यांनी माहिती दिली.

फुफ्फुस प्रणाली मॉडेलच्या दिशेने

संशोधकांच्या मते, फुफ्फुसांच्या संपूर्ण प्रणालीचे सर्वंकष मॉडेल तयार करणे हे पुढील उद्दिष्ट असून, या अभ्यासामुळे श्वसनमार्गांतील आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे.

हे संशोधन कोणाला कसे उपयोगी?

दमा आणि अ‍ॅलर्जीच्या झटक्यांचे भौतिकशास्त्रीय कारण समजण्यास मदत
प्रदूषित शहरांतील नागरिकांसाठी आरोग्यधोका अधिक स्पष्ट
श्वसनाद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांचे अचूक डिझाइन करण्यासाठी मार्गदर्शन
‘डिझायनर औषधकण’ विकसित करून औषध थेट आवश्यक ठिकाणी पोहोचवण्याची शक्यता

Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Web Title: Increased mucus in the lungs reduces protection iit mumbai research reveals the mucus paradox

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • health
  • IIT
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
4

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.