Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रजनीशची यशोगाथा: ‘स्वतःवर विश्वास असेल तर जग जिंकता येते’ JEE 2025 मध्ये मिळवले 96.2% गुण

रजनीश तिवारीने आर्थिक अडचणी, अपुरी साधनं आणि सामाजिक दबाव यांचा सामना करत JEE 2025 मध्ये 96.2% गुण मिळवत यश मिळवलं. कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या मदतीने आणि स्वतःच्या शिस्तीने त्याने आपलं स्वप्न साकार केलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 02:53 PM
रजनीशची यशोगाथा: ‘स्वतःवर विश्वास असेल तर जग जिंकता येते’ JEE 2025 मध्ये मिळवले  96.2% गुण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला रजनीश हा ऑटोचालकाचा मुलगा आहे. त्याचे वडील पूर्वी पानटपरी चालवत होते. घरची परिस्थिती इतकी बिकट की, महागडं कोचिंग घेणं शक्यच नव्हतं. पण त्याने परिस्थितीला शरण न जाता, चिकाटी, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर JEE 2025 मध्ये 96.2% गुण मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

भारतीय नौदलात सिव्हिलिअन पदासाठी करा अर्ज; इच्छुक असाल तर लवकर करा Apply

त्याच्या यशामागे केवळ त्याची मेहनत नव्हे, तर कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) ची भूमिका देखील महत्त्वाची होती. त्यांनी त्याला अभ्यासासाठी लॅपटॉप, साहित्य, आणि एक वैयक्तिक मार्गदर्शक दिला. “माझ्यावर माझा विश्वास राहिला नव्हता, पण रागिनी मॅडमना माझ्यावर विश्वास होता,” असं तो अभिमानाने सांगतो.

रजनीशची JEE ची तयारी ऑनलाइन कोर्समधून झाली. सुरुवातीला उशिरा सुरुवात झाली, ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये अडचणी आल्या, झोपेचा वेळ बिघडला आणि गुण कमी येऊ लागले. शिक्षकांनी शंका व्यक्त केली, नातेवाईकांनी टवाळी केली. पण त्याने हार मानली नाही. पहिल्या प्रयत्नात 120 गुण (94%) मिळवले, नंतरच्या प्रयत्नात मेहनत अधिक वाढवत 153 गुणांसह 96.2% मिळवले.

त्याच्या वर्गातील इतर सात जणांपैकी फक्त रजनीश आणि एक मित्र बारावीपर्यंत पोहोचले. बाकीच्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. रजनीशने मात्र धीर सोडला नाही. “महागडं कोचिंग लागते असं काही नाही,” रजनीश म्हणतो. “तुम्हाला हवा असतो विश्वास, शिस्त, आणि कोणी तरी तुमच्यावर विश्वास ठेवणारा. माझ्यासाठी ते होतं KEF आणि रागिनी मॅडम.” रजनीशने केवळ JEE परीक्षा पास केली नाही तर त्याने आपलं भविष्यच नव्याने घडवलं.

फक्त १३ जागांसाठी संधी! RRC पूर्वी रेल्वेमध्ये भरती; Scouts & Guides पदे येतील भरण्यात

रजनीशची ही यशोगाथा प्रत्येक त्या तरुणासाठी प्रेरणा आहे जो आर्थिक मर्यादांमध्येही मोठं स्वप्न पाहतो आणि जिद्दीने ते पूर्णही करतो. रजनीशने JEE मध्ये इतके जास्त गन मिळवत त्याच्या कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे नाव उज्वल केले आहे. त्याची ही संघर्षगाथा तसेच यशोगाथा ही अनेक तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे .

Web Title: Success story of rajneesh tiwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 02:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.