फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलात भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चार्जमन, ड्राफ्ट्समन तसेच ट्रेड्समन पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन रूपात करायचे आहे. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्यात यावे. अर्ज सुरु करण्याची तारीख ५ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात आयोजित परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांन काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २९५ रुपये भरायचे आहे. तसेच इतर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही निकष पात्र करणे अनिवार्य आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत.
शैक्षणिक निकषांनुसार, सिव्हिलिअन पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10th/12th/ITI/Degree/Diploma या शैक्षणिक अटींना पात्र असावा तर त्याचे किमान वय १८ वर्षे ते ४५ वर्षे इतके असावे. १,१०० जागांपेक्षा जास्त पदे या भरतीमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेवटची तारीख लक्षात घेऊन उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना चार टप्प्यांना सामोरे जात त्यांना पात्र करावे लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात उमेदवारांची CBT (Computer Based Examination) परीक्षा घेतली जाईल. यानंतर उमेदवारांचुई कौशल्यांची चाचणी घेतली जाईल. दस्तऐवजांची पडताळणीसहित उमेदवारांना वैद्यकीय चाचणी पात्र करावी लागणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.