फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारतीय सैन्यामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे टेरिटोरिअल आर्मी ऑफिसर पदी नियुक्ती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या प्रक्रियेला आता सुरु करण्यात आली आहे. जर तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये भरती व्हायचे आहे तर लवकर अर्ज प्रक्रियेत सहभाग घ्या आणि अर्ज नोंदवा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये पुरुष आणि स्त्री दोघे अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : युनिअन बँकेमधून भरती संबंधित बातमी; ‘या’ पदांसाठी होणार उमेदवारांची निवड
या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या उमेदवारांना १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुळात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसबंधित काही अटी शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. एकंदरीत, या राज प्रक्रियेत सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ आहे. तर जास्तीत जास्त ४२ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांच्या वयाची गणना अधिसूचनेत नियमानुसार केली जाणारा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जादरम्यान उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहे. ही अर्ज प्रक्रिया पूर्णता निशुल्क आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ इच्छुक असणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थानातून पदवीधर असावा. शिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय सैन्याने जाहीर केलेली अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा. या भरती प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधारे यूएमद्वाराची निवड केली जाणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा, व्यावहारिक चाचणी, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणीचा समावेश आहे.
हे देखील वाचा : सुप्रीम कोर्टामध्ये अटेंडंट पदाची भरती; दहावी उत्तीर्णही करू शकतो अर्ज
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
सर्वप्रथम टेरिटोरियल आर्मी भरतीच्या अधिसूचनेला डाउनलोड करा.
अधिसूचनेत दिलेल्या ऍप्लिकेशन फॉर्मला डाउनलोड करा.
त्याची प्रिंट आऊट घेऊन मागितलेली आवश्यक माहिती भरून घ्या.
आपला पासपोर्ट साईज फोटो लावून फॉर्मवर आपली स्वाक्षरी करा.
मागितलेले सगळे दस्तऐवज अर्जाच्या फॉर्मला लावून घ्या.
फॉर्म तपासून घ्या आणि एका लिफाफ्यामध्ये भरून घ्या.
अधिसूचनेत नमूद असलेल्या पत्त्यावर अर्जाचा फॉर्म पाठवा.