फोटो सौजन्य - Social Media
वाणिज्य क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधीला निर्मिती मिळाली आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक आहात तर हीच ती वेळ आहे तुमच्या स्वप्नांना उजाळा देण्याची. युनिअन बँकेमध्ये अप्रेंटिसशिपच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. बँकेमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे. या भरती प्रक्रियेसंबंधित अधिसूचना युनिअन बँकेने हल्लीच जाहीर केले होते. या अधिसूचनेत या भरती प्रक्रियेसंबंधित सखोल माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. या भरती संबंधित सखोल माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : सुप्रीम कोर्टामध्ये अटेंडंट पदाची भरती; दहावी उत्तीर्णही करू शकतो अर्ज
ऑगस्टच्या २८ तारखेला या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यासही सुरुवात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांना १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळेचे भान ठेवून अर्ज लवकरात लवकर करण्याचे निर्देश युनिअन बँकेने दिले आहेत. या भरती संबंधित अर्ज उमेदवारांना apprenticeshipindia.gov.in याअधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे. त्याचबरोबर या भरती संबंधित काही अटी शर्तींची अंमलबजावणी युनिअन बँकेने केले आहेत. या अटींना पात्र असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. या अटी शिक्षण तसेच वयोमर्यादेसंबंधित आहेत.
अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे महत्वाचं आहे. उमेदवाराचं पदवीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत, कोणत्याही स्ट्रीममधून पदवीधर असलेला उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू शकतो. वयोमर्यादे संबंधित अटीनुसार, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे तर कमाल वय २८ वर्षे असणे गरजेचे आहे. जर उमेदवार आरक्षित प्रवर्गातील असेल तर नियमांच्या आधारे सूट दिली जाईल. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्कामध्ये आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट दिली गेली आहे. जनरल तसेच ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरावे लागणार आहे. तर हीच रक्कम SC /ST तसेच महिला उमेदवारांसाठी ६०० रुपये इतकी आहे. तर पीडब्ल्यूडी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.