Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीस्कूलमध्ये टेंपल मॅनेजमेंट प्रोग्राम बॅच–2 ची सुरुवात! मंदिर व्यवस्थापन शिक्षणाला मिळणार नवी दिशा

मंदिराचे व्यवस्थापन म्हणजे एक भक्तिमय करिअर! V School मध्ये टेम्पल मॅनेजमेंट प्रोग्रॅम बॅच २ शिक्षणाला सुरुवात करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 18, 2025 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई येथे 13 डिसेंबर 2025 रोजी टेंपल मॅनेजमेंट प्रोग्रामच्या बॅच–2 ची अधिकृत सुरुवात करण्यात आली
  • सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती
  • प्रामाणिकपणा, आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत
देशभरात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि व्यावसायिक कार्यपद्धती यांना दिवसेंदिवस अधिक महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत मंदिर व धार्मिक संस्थांचे सुयोग्य, शिस्तबद्ध आणि आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून प्रिन्स एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (वीस्कूल), मुंबई येथे 13 डिसेंबर 2025 रोजी टेंपल मॅनेजमेंट प्रोग्रामच्या बॅच–2 ची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

Akola News: ‘विज्ञानवेध’ उपक्रमांतर्गत ३१ विद्यार्थ्यांचा इस्रो व दक्षिण भारत शैक्षणिक दौरा

हा अभ्यासक्रम मंदिर आणि धार्मिक संस्थांमध्ये आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे सखोल व व्यावहारिक ज्ञान देणारा आहे. उद्घाटन समारंभास शिक्षण, कायदा, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी सर्व वक्त्यांनी एकमताने सांगितले की, आज मंदिरांचे व्यवस्थापन केवळ पूजा-पाठ आणि धार्मिक विधींपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यात प्रामाणिकपणा, आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.

या अभ्यासक्रमात केवळ सैद्धांतिक शिक्षणावर भर न देता, प्रत्यक्ष अनुभव, केस स्टडीज आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येते. सेवा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ट्रस्ट प्रशासन, अध्यात्मिक अर्थव्यवस्था, भक्त व्यवस्थापन तसेच समाजाशी दृढ नाते निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरांच्या दैनंदिन कामकाजासोबतच दीर्घकालीन व्यवस्थापनाची समज विकसित करता येते.

नवीन बॅचचे स्वागत करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मॅनेजिंग कौन्सिल अ‍ॅड. एस. के. जैन यांनी सांगितले की, “आज ट्रस्ट आणि मंदिरांचे जबाबदार व्यवस्थापन अत्यंत आवश्यक झाले आहे. मंदिर व्यवस्थापन करताना भक्त, पुजारी, ट्रस्टी, शासन आणि समाज या सर्व घटकांचा समतोल साधावा लागतो. हा अभ्यासक्रम पारदर्शक प्रशासन, मंदिर मालमत्तेची सुरक्षा, निधी व्यवस्थापन आणि भाविकांच्या गर्दीचे नियोजन याबाबत योग्य दिशा देतो.”

वीस्कूलचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा कार्यक्रम “राष्ट्रनिर्मितीसाठी मंदिर व्यवस्थापन” या व्यापक विचारावर आधारित आहे. मंदिर ही केवळ श्रद्धेची ठिकाणे नसून, ती समाज, संस्कृती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचीही महत्त्वाची केंद्रे आहेत. भारतीय मूल्ये आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा समन्वय साधत ‘विकसित भारत 2047’ साठी सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्व घडवणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

व्यवसायाच्या दुनियेत कमवाल नाव! ‘हे’ कोर्सेस करा अन् सुरु करा स्टार्टअप, ‘पैसा ही पैसा होगा’

टेंपल मॅनेजमेंट प्रोग्रामच्या बॅच 2 च्या सुरुवातीसह, वीस्कूलने प्रामाणिक, मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख नेतृत्व घडवण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल टाकले आहे. भविष्यात हे प्रशिक्षित विद्यार्थी मंदिर व धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करतील आणि मंदिरांना आस्था, सेवा, शिस्त व राष्ट्रनिर्मितीची मजबूत केंद्रे बनवण्यात मोलाची भूमिका बजावतील.

Web Title: The temple management program batch 2 has started at vschool

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.