फोटो सौजन्य - Social Media
व्यवसायात येऊन स्टार्ट अप्स सुरु करण्यासाठी Entrepreneurship, डिजिटल मार्केटिंग, डेटा अॅनालिटिक्स, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, फायनान्शियल मॅनेजमेंट, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि बिझनेस मॉडेल, अकाउंटिंग व फायनान्स, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व डिझाइन थिंकिंग तसेच लीडरशिप व टीम बिल्डिंग हे कोर्सेस करून घ्या. हे कोर्सेस करण्याचे अमाप फायदे आहेत. आपले कौशल्य तयार करण्यासाठी हे कोर्सेस करा. यात समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची सवय होते. नेतृत्वगुण (Leadership Skills) येतात. नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते. पैशांचे नियोजन (Financial Literacy) योग्य प्रकारे करता येते.
हे कोर्सेस विविध ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु योग्य ठिकाणाहून करणे आपल्यासाठी उत्तम आहे. हे कोर्सेस ऑनलाईन तसेच ऑफलाईनही करता येऊ शकते. Startup India Learning Program (सरकारी) येथे हे कोर्स उपल्बध आहेत. तसेच MeitY Startup Hub येथेही हे कोर्स सापडतात. IIM, IIT यांचे ऑनलाइन/ऑफलाइन कोर्सही तुम्ही करू शकता. Coursera, Udemy सारखे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म आहेत जिथे काही कोर्स मोफत आहेत तर काही पात्र केल्यावर सर्टिफिकेटही मिळतात.
का करावे हे कोर्स?






