
फोटो सौजन्य - Social Media
भारत कृषिप्रधान देश आहे. पूर्वीपासून देशामध्य शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या या व्यवसायामध्ये जरी घट झाली असली, तरी ग्रामीण भागांमध्ये शेतीचा आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा दरारा अगदी तसाच आहे. सध्या अनेक जण या व्यवसायाकडून तोंड मुरडत आहेत आणि नोकरीकडे वळत आहेत. कोणते कार्य करणे आणि कोणत्या कार्यातून पुढे जाणे? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, परंतु शेतीमध्ये तरुणांचे लक्ष लागणे काळाची गरज बनत चालली आहे. परंतु, काही तरुण शेतीमध्ये फार उत्सुक आहेत. शेतीविषयक अभ्यास करून त्यामध्ये PHd करत आहेत. अशा तरुणांमुळे भविष्यात शेती खूप विकसित होणार आहे, याच्या खुणा आताच उमटू लागल्या आहेत. तशी शेती विकसित झालेलीच आहे. तंत्रज्ञानामुळे शेती करणे फार सोपे झाले आहे. परंतु मुद्दा असा आहे कि हे तंत्रज्ञान काही सर्व सामान्य बळीराजाला परवडणारं नाही. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे काही प्रमाणात या क्षेत्रामध्ये तरी माहिती असून देखील मागे पडत चालला आहे. परंतु, काही तरुणांनी बळीराजाचा हा वारसा पुढे नेण्याचे ठरविले आहे. जर तुम्हालाही कृषी क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे आहे तर अशा अनेक संधी आहेत, ज्याने तुम्ही या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकता. चला तर मग, जाणून घेऊयात.
हे देखील वाचा :DIC मध्ये रोजगाराची संधी; नियुक्त उमेदवारांना मिळणार ५०,००० वेतन, अर्जाला सुरुवात
कृषी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कृषी शास्त्रज्ञांना फार महत्वाचे स्थान आहे. कृषी शास्त्रज्ञ सीझेटीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावतात. तसेच बीजप्रक्रिया आणि पर्यावरण अनुकूल पद्धतींचा शोध लावणे हे त्यांच्या कामाचे मुख्य घटक असतात. कृषी शास्त्रज्ञांची मागणी देशातील कृषी विद्यापीठांमध्ये असते. तसेच संशोधन संस्थांमध्येही हे महत्वाची भूमिका बजावतात.
सध्या शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरले जाते. यंत्रणांच्या वाढत्या मागणीमुळे कृषी क्षेत्रामध्ये अभियंत्यांच्या जबाबदाऱ्या फार वाढलेल्या आहेत. त्या पार पाडण्यासाठी कृषी अभियंताची गरज भासते. कृषी क्षेत्रातील विविध कामे कृषी अभियंता करतो, जसे कि, पाण्याचे व्यवस्थापन करणे, सिंचन पद्धती, मातीची गुणवत्ता आणि यांत्रिक शेती यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करणे.
कृषी विस्तार अधिकारी साधारणपणे तंत्रज्ञानाच्या माहितीचा विस्तार करण्याचे काम करतो. शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणीव करून देणे, त्याबद्दल त्यांना अचूक माहिती सांगणे तसेच मार्गदर्शन करणे कृषी विस्तार अधिकाऱ्यांचे काम आहे. तसेच सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सहभाग मोठा असतो.
शेती उत्पादनाच्या गोष्टींच्या किमती ठरवणे, बाजारपेठेमध्ये वाढलेली मागणी आणि त्यामागील पुरवठा यांचे विश्लेषण करणे तसेच शेतीच्या उत्पन्नाचे गणित अभ्यासणे कृषी अर्थशास्त्रज्ञांचे कार्य आहे. शेतीच्या बाजारपेठेसंबंधित सर्व आर्थिक गणिते हाताळण्याचे काम कृषी अर्थशास्त्रज्ञ करतात. शेतकऱ्यांना आर्थिक सल्ला देण्यात महत्वाची भूमिकेला बजावतात.
जैविक शेती, हायड्रोपोनिक्स, बागायती शेती, आणि प्रक्रिया उद्योग अशा नवनवीन उपक्रमांमधून कृषी उद्योजक शेतीशी निगडीत व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होत आहेत. ग्रामीण भागामध्ये तालुक्यांच्या ठिकाणी या व्यवसायाला जास्त मागणी आहे.