फोटो सौजन्य - Social Media
देशामध्ये स्टार्ट अप सुरु करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. हे पर्याय देशाचे व वातावरण पाहता फार सोयीस्कर आहेत. जर तुम्ही देखील व्यावसायिक क्षेत्रामध्ये येण्यास इच्छुक आहात? किंवा कोणते तरी व्यवसाय सुरु करण्याचे योजित आहात? तर हा लेख नक्कीच तुमच्या पसंतीस येणार आहे. तुमच्यासाठी हे पर्याय फार महत्वाचे ठरणार आहेत. तसेच अनेक व्यावसायिक या क्षेत्रांमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहेत. तसेच नव्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत.
हे देखील वाचा : एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2025: ‘या’ तारखेंदरम्यान करता येणार अर्जात सुधार
फाइनेन्शिअल सर्वीसेज संबंधित अनेक स्टार्टअप आहेत, ज्यांच्या साहाय्याने अनके जण चांगल्या रकमेत नफा कमवत आहेत. उदाहरणार्थ, बजाज फायनान्स तसेच आदित्य बिर्ला कॅपिटल हे देशातील मोठ्या फाइनेन्शिअल सर्वीसेजपैकी एक आहेत. फाइनेन्शिअल सर्वीसेजबरोबर रिटेल सेक्टरही नव्या स्टार्ट अपला संधी देत आहेत. गेल्या काही दिवसात ३० नव्या स्टार्ट अपने उत्तम प्रदर्शन केले आहे. जर तुम्ही व्यवसाय क्षेत्रामध्ये येण्याचे पाहत आहात तर रिटेल क्षेत्र चांगले पर्याय ठरू शकते.
या क्षेत्रात रिलायन्स तसेच व्ही मार्ट या कंपन्यांनी फार उच्च पद प्राप्त केले आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये सुरु केलेले स्टार्ट अप नक्कीच भविष्यात यशस्वी ठरू शकतात. आरोग्यविषयक समस्या अशा असतात ज्याला जास्त अंत नाही. त्या सुरूच असतात, अशा वेळी आरोग्य क्षेत्राला फार फायदा होत असतो. या क्षेत्रातील २६ असे स्टार्ट अप आहेत, ज्या उत्तम कार्य करत आहेत.
हे देखील वाचा : RRB ने जाहीर केले विविध पदांसाठी आयोजीत परीक्षेचे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा
सॉफ्टवेअर तसेच सर्वीसेज क्षेत्रामध्ये व्यवसायाला सुरुवात करणे फार फायद्याचे ठरेल. या क्षेत्रामध्ये नव्या २१ स्टार्ट अपने उत्तम प्रदर्शन केले आहे. जर तुम्ही व्यवसाय करण्याचे पाहत आहात, तर नक्कीच या क्षेत्रामध्ये विचार करू शकतात. ट्रान्सपोर्टेशनचा पर्याय एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रातील १६ स्टार्टअपने भरारी घेतली आहे. व्यवसाय क्षेत्रात या व्यवसायाला फार मागणी आहे. बायजूस असो वा इतर कोणती कोचिंग संस्था अनेकांनी या क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच आपणही या क्षेत्रामध्ये लहान कोचिंग क्षेत्रांच्या माध्यमातून आपले शिक्षण साम्रज्य उभे करू शकता. तसेच व्यवसाय क्षेत्रांमध्ये मीडिया क्षेत्र एक उभारते क्षेत्र आहे. कला क्षेत्रात रस असेल तर या क्षेत्रामध्ये स्टार्ट अप असणे फायद्याचे ठरेल.