फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल फेर्टीलायझर लिमिटेड (NFL)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरतीच्या प्रक्रिये संदर्भांत अधिकृत अधिसूचना जाहिर करण्यात आली होती. अर्ज कर्त्या उमेदवारांना या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात येता येणार आहे . उमेदवारांन ते पाहता तसेच डाउनलोड करता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करायचे आहे. उमेदवारांना नोव्हेंबरच्या ८ तारखेपर्यंत अर्ज करायचे आहे. आज अखेरची तारीख असल्याने आजच अर्ज करता येणार आहे. बहुतेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे. जर तुम्ही इच्छुक असून ही अद्याप या भरतीसाठी अर्ज केले नाही आहे तर आजच्या लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे. नोव्हेंबरच्या १० तारखेपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना केलेला अर्ज सुधारता येणार आहे.
हे देखील वाचा : कस्टम विभागामध्ये भरतीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती
उमेदवारांना अर्ज करताना काही अर्ज शुल्काची रक्कम भरावी लागणार आहे. काही आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कात काही प्रमाणामध्ये सूट देण्यात आली आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती, PWD आणि ESM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच इतर प्रवर्ग जसे कि सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागणार आहे. OBC तसेच EWS प्रव्रगातून येणाऱ्या उमेदवारांना देखील अर्ज शुल्क म्हणून २०० रुपयांची भरपाई करावी लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्तींना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. तसेच उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी काही शैक्षणिक अटींना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. Non-Executive च्या रिकाम्या जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. एकूण ३३६ जागा रिक्त आहेत, त्यांना भरण्यासाठी उमेदवारांची नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. मुळात, या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे. उमेदवारांनीच या भरती संबंधित येत असलेल्या बातमींवर नजर ठेवावे. लवकरच या भरती संबंधित आयोजित असलेल्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. त्यानुसार अर्ज कार्टाय्या उमेदवारांनी तयारीला लागावे.
हे देखील वाचा : NIACL AO साठी प्रवेशपत्र जाहीर; वाचा सविस्तर
शैक्षणिक अटी पाहिल्या गेल्या तर उमेदवाराचे पदासबंधीत शिक्षण झालेले असावे. अधिक माहितीसाठी तसेच अटी शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. तीन टप्प्यांमध्ये नियुक्तीची परीक्षा आयोजित केली गेली आहे. लेखी परीक्षा उमेदवारांना नियुक्त करावी लागणार आहे. यानंतर दस्तऐवजांची पडताळणी केली जाणार आहे. वैद्यकीय चाचणीसह सर्व टप्प्यांना पात्र उमेदवार नियुक्तीस पात्र ठरणार आहे.