फोटो सौजन्य - Social Media
न्यू इंडिया एज्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)ने काही महिन्यांपूर्वी भरतीला सुरुवात केली आहे. मुळात, या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या नियुक्त प्रक्रियेला सुरुवात केली जात आहे. या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेला उपस्थित राहता येणार आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या रिक्त पदांसाठी या भरतीच्या प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. १७० उमेदवारांना या पदासाठी नियुक्त केले जाणार होते. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला. अर्ज प्रक्रियेमध्ये सहभाग घेणाऱ्या उमेदवारांची संख्या फार होती. या सर्व अर्ज कर्त्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल असे सांगण्यात आले होते. मुळात, पहिला टप्पा पार पडला आहे. १३ ऑक्टोबर रोजी भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तर १७ नोव्हेंबरला मेन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : रेल्वेमध्ये काम करण्यासाठी उत्सुक उमेदवारांनो, वाचा आनंदाची बातमी, लागा तयारीला
अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेत उपस्थित राहायचे आहे. मुळात, या परीक्षेत पात्र उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेत गती मिळणार आहे. तसेच नियुक्तीस पात्र होण्याची संधी मिळणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि, या परीक्षेसंदर्भात प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र पाहता येणार आहे. तसेच ते डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश पत्रांना डाउनलोड करून घ्यावे. तसेच परीक्षेला उपस्थित राहताना सोबत प्रवेश पात्र आणावे, अन्यथा उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
NIACL ने ही भरती प्रक्रिया AO च्या रिक्त पदांसाठी जाहीर केली असून यामध्ये अनेक उमेदवारांनी सहभाग घेतला. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे होते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NIACL च्या new .india.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागले होते. तसेच अद्याप कुणी उमेदवार या भरती संबंधित जाहीर करण्यात आलेले अधिकृत अधिसूचनेचा अभ्यास करू इच्छित असेल तर त्याने या संकेतस्थळाला भेट द्यावे आणि या भरतीविषयक सखोल महिती जाणून घ्यावेत.
हे देखील वाचा : ECGC PO भरतीसाठी प्रवेश पत्र जाहीर; वाचा सविस्तर
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागले होते. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार होते. तर OBC तससह EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही ८५० रुपयांची भरपाई करावी लागली होती. अर्ज शुल्कात आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या घटकांना अफक्त १०० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले होते. २१ वर्षे ते ३० वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. तर अर्ज करण्यास पात्र उमेदवार पदा संबंधित विषयामध्ये पदवीधर हवा होता.