फोटो सौजन्य - Social Media
देशाच्या कस्टम विभागामध्ये भरतीला आयोजित केले गेले आहे. या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या १७ तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये जर आपण अर्ज करण्यास इच्छुक आहात तर आता या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची विंडो सुरु करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. यामध्ये या भरती संबंधित अधिक आणि सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी या भरतीसाठी जाहीर करण्यात आलेले अधिसूचना वाचून काढावे. स्त्री तसेच पुरुष दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी हे संपूर्ण लेख वाचा.
हे देखील वाचा : रेल्वेमध्ये काम करण्यासाठी उत्सुक उमेदवारांनो, वाचा आनंदाची बातमी, लागा तयारीला
कस्टम विभागाच्या या भरती संबंधित विशेष माहिती म्हणजे उमेदवारांना अर्ज शुक्ल भरायचे नाही आहे. उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. फक्त आरक्षित प्रवर्गातील नव्हे तर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अगदी मोफत अर्ज करायचे आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही बाबी लक्षात घायचे आहेत. काही ठराविक उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. काही अटी शर्ती पात्र करणे उमेदवारांना अनिवार्य आहे. या अटी शर्ती अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. मुळात, या अटी शर्ती इच्छुक उमेदवाराच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसेच काही ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या वयोमर्यादेनुसार, किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकंदरीत, १८ वर्ष ते २५ वर्ष आयु असलेले उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. शिक्षणासंबंधित जाहीर करण्यात आलेल्या अटीनुसार, दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेण्यास पात्र आहेत. परंतु, उमेदवारांना या क्षेत्रामध्ये काही अनुभव असणे आवश्यक आहे. किमान ३ वर्षांचा अनुभव निश्चित करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे.
हे देखील वाचा : BIS ने जाहीर केले प्रवेश पत्र; ‘या’ तारखेला सुरु होणार परीक्षा
अशा प्रकारे करता येईल अर्ज