पेपर लिकमुळे 2024 ची नीट परीक्षा विवादामध्ये सापडली. परीक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे आता नीट परीक्षा 2025 नियोजन करताना काही बदल एनटीएकडून केले जाणार आहे. एनटीएकडून यासाठी एक योजना तयार केली जात आहे. जी परीक्षाव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवणून आणणार आहे. 2025 ची नीट यूजी परीक्षा मे च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
2024 मध्ये नीट परीक्षेचे पेपर लिक झाल्याने 24 लाख विद्यार्थी जे परीक्षा बसले होते त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी या लिकमुळे परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती. पेपर लिकमुळे देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले गेले होते त्यांची पुर्नपरीक्षा आयोजित केली गेली. या सर्व गोंधळामुळे एटीएवर प्रचंड टीका झाली होती.
2025 मध्ये नीट यूजी परीक्षेच्या नियोजनातील बदल
नीट यूजी परीक्षा 2025 मध्ये अनेक बदल केले जाण्याची शक्यता आहे. एनटीए या करिता नवीन योजना तयार करत आहे. 2025 च्या नीट यूजी केंद्रामध्ये बदल करण्यात येतील. सुत्रानुसार नीट यूजी परीक्षेसाठी सरकारी संस्थांमध्ये ही परीक्षा केंद्र तयार केले जातील. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. तसेच विद्यार्थी ओळख प्रक्रियेमध्येही नवीन अपडेटेड तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. सायबर सिक्युरिटीच्या बाबतीतही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
समस्येसाठी पोर्टल, शिक्षक कर्मचारी यांचे समुपदेशन
नीट यूजी 2025 परीक्षेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष प्रयत्न करत एनटीएकडून केले जात आहे. मात्र जर याशिवाय सिस्टिममध्ये काही त्रुटी राहतात तसेच यावर्षीप्रमाणे पेपर लीकचे प्रकरण समोर आले तर परीक्षार्थींसाठी एक नवीन पोर्टल बनविले जाणार आहे जेथे ते आपली समस्या पाठवू शकतात. परीक्षा केंद्रातील सुरक्षेवर जास्त भर दिला जात आहे. यासाठी परीक्षा केंद्रातील शिक्षक, कर्मचारी यांचे समुपदेशन केले जाणार आहे.