career (फोटो सौजन्य : social media)
केंद्रीय लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण सेवा- २ या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार UPSC CDS 2 चा निकाल ऑक्टोबर 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. ही परीक्षा सेप्टेंबरमध्ये घेण्यात आली होती. तुम्ही तुमचा निकाल घरबसल्या ऑनलाईन पाहू शकता. पण कस आणि कुठे? चला जाणून घेऊया…
कसे तपासाल तुमचे UPSC CDS 2 चा निकाल?
सर्वात पहिले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in ला भेट द्या.
होमपेजवर परीक्षेच्या निकालाची लिंक दिसेल – ‘UPSC CDS 2 Result 2025’. त्यावर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला निकालाचा PDF नवर दिसेल. त्यावर क्लीक करा.
यादीमध्ये UPSC CDS 2 उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची नावे असतील.
तुमचे नाव पटकन तपासण्यासाठी, cltr+f बटण दाबा आणि तुमचा रोल नंबर टाका.
उत्तीर्ण झाल्यावर, तुमचा रोल नंबर आणि नाव स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही ते येथून प्रिंट किंवा डाउनलोड देखील करू शकता, जे भविष्यात उपयुक्त ठरू शकते.
आता स्कोअरकार्ड कसे पाहायचे?
UPSC CDS 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच स्कोअरकार्ड प्रसिद्ध होईल. हे तपासण्यासाठी, तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यांनतर स्कोअरकार्डमध्ये उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षेचे नाव, मिळालेले गुण, एकूण गुण आणि निकालाची स्थिती दर्शविली जाते. याबाबत अधिकच्या माहितीसाठी, अधिकृत UPSC वेबसाइटला भेट द्या.
वर्षातून २ वेळा UPSC CDS ची परीक्षा
संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा (CDS) ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. ही विविध अधिकारी पदांसाठी राष्ट्रीय स्तरावरील
परीक्षा आहे. भारतीय लष्करी अकादमी (IMA), अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA), भारतीय वायुसेना अकादमी (IAFA) आणि भारतीय नौदल अकादमी (INA) अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी CDS परीक्षा घेतली जाते. UPSC CDS 2 परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती आणि निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
Delhi DDA Recruitment 2025: डीडीएने 1731 पदांवर काढल्या रिक्त जागा, अर्ज करण्याची तारीख आणि पद्धत