डीडीए रिक्रूटमेंटसाठी किती रिक्त जागा (फोटो सौजन्य - DDA)
दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) आज, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी १,७३१ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त पदांची यादी २६ श्रेणींमध्ये आहे. DDA रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट dda.gov.in ला भेट द्यावी. काही पदे लेव्हल-११ पे मॅट्रिक्समध्ये दिली जातील, ज्यांचे वेतन ₹६७,७०० ते ₹२,०८,७०० पर्यंत असेल.
यानुसार आता अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे आणि रिक्त पदांची माहिती, किती वेतन मिळणार या सर्वांची इत्यंभूत माहिती आपण या लेखातून घेऊया.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
या पदांसाठी अर्ज करण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२५ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे. ही परीक्षा संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल आणि ती डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.
त्वरीत करा GATE 2026 साठी अर्ज, नाहीतर भरावा लागेल दंड; कशी आहे प्रक्रिया
दिल्ली DDA भरती २०२५: रिक्त पदांची माहिती
ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट पदांसाठी १९९ रिक्त पदे आहेत. या पदासाठी ₹१९,९०० ते ₹६३,२०० (लेव्हल २) पगार असू शकतो.
पदांसाठी आवश्यक पात्रता
अभियांत्रिकी पदांसाठी
अभियांत्रिकी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा बीई/बीटेक असणे आवश्यक आहे. लेव्हल ११ च्या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे, तर लेव्हल १० च्या रिक्त पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि काहींसाठी ३० वर्षे आहे.
नायब तहसीलदार पदांसाठी
नायब तहसीलदार पदासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे आणि कायद्याची पदवी देखील फायदेशीर ठरू शकते.
सहाय्यक सुरक्षा अधिकारी
सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी, उमेदवारांकडे (पुरुष आणि महिला दोन्ही) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यांनी विशिष्ट शारीरिक मापदंड पूर्ण केले पाहिजेत. महिला उमेदवारांना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेत सुरक्षा आणि अग्निशमन कर्तव्यांमध्ये तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, किंवा संरक्षण किंवा पोलिसात नियमित सेवा असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे.
डीडीए भरती २०२५: अर्ज कसा करावा?