संघ लोक सेवा आयोग (UPSC) तर्फे इंजिनियरिंग सेवा परीक्षा 2026 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशातील प्रतिष्ठित अभियंता पदांसाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना upsconline.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.
AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या
शैक्षणिक पात्रता:
या परीक्षेसाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंग विषयातील पदवी (B.E. किंवा B.Tech.) असणे आवश्यक आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतील.
वयोमर्यादा:
अर्जदाराचे वय १ जानेवारी २०२६ रोजी किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ नंतर आणि १ जानेवारी २००५ आधी झालेला असावा. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल:
- प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam)
- मुख्य परीक्षा (Mains Exam)
- मुलाखत (Interview)
प्रथम दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड ही तीनही टप्प्यांतील एकत्रित गुणवत्तेवर होईल.
अर्ज शुल्क:
- महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी: शुल्क नाही
- इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹200
SBI SO पदासाठी करता येणार अर्ज! मुदत ‘या’ तारखेपर्यंत आली वाढवण्यात
अर्ज प्रक्रिया:
- upsconline.nic.in या संकेतस्थळावर जा.
- “Examination Notice” या विभागात “Engineering Services (Preliminary) Examination, 2026” हा पर्याय निवडा.
- नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करा.
- आपले नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक अशी माहिती भरून नोंदणी करा.
- Part 2 मध्ये लॉगिन करून आवश्यक तपशील भरा.
- पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे योग्य आकारात अपलोड करा.
- परीक्षा केंद्र निवडून शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
- शेवटी अर्जाची प्रिंट काढून जतन करा.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.