सौजन्य : सोशल मीडिया
संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) अभियांत्रिकी सेवा प्रिलीम्स परीक्षा (ESE) 2025 चे अधिकृत वेळापत्रक जारी केले आहे. युपीएसीच्या upsc.gov या वेबसाईटवर जाऊन उमेदवार हे वेळापत्रक तपासू शकतात आणि डाऊनलोड करु शकतात. जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पूर्वपरीक्षा ही 8 जून 2025 रोजी होणार आहे. UPSC ESE प्रिलिम्स परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पेपर 1 सकाळी 9.30 ते 11:30 या वेळेत आणि दुसरा पेपर दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत होईल.
पहिल्या शिफ्ट दरम्यान, सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये उमेदवार अभियांत्रिकी अभियोग्यता पेपर (पेपर-I) आणि सामान्य अध्ययन परीक्षेसाठी उपस्थित राहतील. या पेपरमध्ये 200 गुण असणार आहेत. अर्जदारांना पेपर सोडवण्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाणार आहे.
विविध विभागानुसार असणारा पेपर II हा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागातील उमेदवारांकडून दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत घेतला जाणार आहे. हा पेपर एकूण 300 गुणांचा असणार आहे. या पेपरकरिता तीन तासांचा अवधी परीक्षार्थींना दिला जाणार आहे.
यूपीएससी ईएसई प्रिलिम्स 2025 वेळापत्रक तपासण्यासाठी काय करावे?
1: सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइटला upsc.gov.in भेट द्या
2: मुख्य पृष्ठावर, अभियांत्रिकी सेवा (प्रिलिम्स) परीक्षा, 2025 लिंकवर क्लिक करा.
3: त्यानंतर तुम्हाल वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल.
4: वेळापत्रक तपासा ते डाउनलोड करा.
वेळापत्रकाची एक पत्र आवश्यक असल्यास प्रिंट करुन तुमच्याकडे ठेवा.
दरम्यान, UPSC ESE Prelims 2025 परीक्षांसाठी परीक्षार्थीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 22 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार या परीक्षेकरिता अर्ज सादर करू शकतात. नोंदणी प्रक्रियेनंतर, 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत उमेदवारांसाठी अर्ज दुरुस्तीची सुविधा सुरू होणार आहे. उमेदवार या कालावधीत अर्जसंबंधी दुरुस्ती करु शकतात.
UPSC ESE Prelims 2025 अर्ज कसा करावा ?
1. प्रथम UPSC च्या मुख्य वेबसाइटला भेट द्या
2. होमपेजवर UPSC ESE 2025 नोंदणी लिंकवर आणि त्यावर क्लिक करा.
3. त्यानंतर पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा, त्यानंतर अर्ज भरण्यास पुढे जा.
4. अर्ज संपूर्ण भरल्यानंतर , परीक्षेसाठी आवश्यक शुल्क भरा
5. सर्व तपशील पुन्हा एकदा तपासा आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा.
फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा.
ही प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 10 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. युपीएससीच्या या भरती प्रक्रियेतून 457 रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत. या अर्जाची अंतिम तारीख नमूद केल्याप्रमाणे 22 नोव्हेंबर 2024 आहे हे लक्षात ठेवून जे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे.