फोटो सौजन्य - Social Media
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)च्या परीक्षेसाठी तरुणांच्या मनामध्ये एक विशेष दर्जा आहार. या परीक्षेला देशातील एक अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. परंतु, या परीक्षेसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांची संख्या तितकीच असते. दरवर्षी अनेक जण या परीक्षेसाठी उपस्थिओत राहतात. गेल्या वर्षी देशभरातून एकूण १३.४ लाख उमेदवार या भरतीसाठी इच्छुक होते. इतक्या जणांनी या परीक्षेसाठी उपस्थिती लावली होती. दरम्यान, UPSC मध्ये अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांना पात्र करणे अनिवार्य असते. त्यातील निबंधाबाबत असलेला प्रश्न सगळ्यांची फजिती करून जातो. कारण, आपण लहानपणापासून निबंध लिहत असतो. त्यामुळे, आपल्याला एक आत्मविश्वास असतो कि आपण हा प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो. आणि उत्तम मार्क मिळवू शकतो. पण कधी कधी हा आत्मविश्वास आपल्याला नडतो आणि आपण हातातले गुण गमवून बसतो.
हे देखील वाचा : National Housing Bank भरतीसाठी तात्काळ करा अर्ज ! वयोमर्यादा 23 ते 35, पगार 78230 रुपये
टाइम मॅनेजमेंट
फक्त निबंध लिहणे महत्वाचे नाही. चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा त्या उत्तरामध्ये क्वालिटी असते. क्वालिटी निबंध लिहण्यासाठी आपल्याकडे तसा वेळही हवा. वेळेच्या अभावामुळे अनेकदा आपले चांगले विचार आपल्या निबंधामध्ये मांडत येत नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन असणे फार महत्वाचे आहे. वेळेचे नियोजण करा आणि त्यानुसार पेपर सोडवा.
उत्तरात स्पष्टता असू द्या
तुमचे जे काही लिहत आहेत त्यामध्ये स्पष्टता हवी. उगाच वेळ कमी आहे म्हणून काहीही लिहून चालत नाही. तुमच्या निबंधामध्ये स्पष्टता पाहिजे. भस्साह सरळ पाहिजे. तुम्ही जी भाषा आणि भाषेचा टोन वापरत आहात तो साधा सरळ आणि समजण्यास सोपा पाहिजे. अन्यथा चेक करणाऱ्याला निबंधच कळाला नाही तर कोणत्या अपेक्षेवर तो तुम्हाला गुण देईल? याचा विचार करण्यात यावा.
विषयांना समजून घ्या
निबंध लिहताना आपण ज्या विषयाबद्दल लिहत आहे, त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला एखाद्या विषयाबद्दल जितके माहिती, तितका तो विषय लिहण्यास सोपा असतो. आपल्याला माहित असल्यामुळे आपण त्याबद्दल अधिक सत्य आणि अधिकच लिहू शकतो. त्यामुळे पुरवण्यात आलेल्या विषयाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
उदहारण द्या
उदाहरण देणे फार महत्वाचं असते. एखादी गोष्ट समजवण्यासाठी उदाहरण देणे फार महत्वाचे असते. उदाहरणासहित गोष्ट लवकर समजून येते. त्यामुळे एखादी महत्वाची गोष्ट समजावताना, उदहरणासहीत समजवणे फार महत्वाचे ठरते.
हे देखील वाचा : बी.जी.देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेची घोषणा ! या तारखेपर्यंत घेता येणार सहभाग, वाचा स्पर्धेचे नियम
प्रूफरिड करा
आपल्या लीहण्यात त्रुटी येणे किंवा काही चुका आढलून येणे अतीशय सामान्य बाब आहे. परंतु, याला थांबवणे आपले काम आहे. आपले निबंध पूर्ण होताच. पुन्हा ते वाचून काढा. त्यावर लक्ष द्या. जर काही त्रुटी किंवा चुका आढळून आल्या तर त्यांना सुधारा. त्यांची दुरुस्ती करा, ज्यानेकरून पुढे गुणांमध्ये काही अडचणी यायला नको.
या सगळ्या बाबींचे अनुसरण करून आपण निबंध अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रभावीपणे करू शकतो. जर आपणही UPSC परीक्षेची तयारी करत आहात तर या टीप्सचे जरूर अनुसरण करा आणि निबांधमध्ये उत्तम गुण मिळवा.