फोटो सौजन्य - Social Media
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जूनियर इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती संदर्भात शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या नोटीसचा आढावा घेता येणार आहे. देशभरातील विविध कार्यालयातील रिक्त पदांना भरण्यासाठी ही नियुक्तीची प्रक्रिया आयोजित करण्याचे योजिले आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ११ जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2024 या तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची मुदत 20 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार या नमूद कालावधीत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही शैक्षणिक अटी शर्ती पात्र करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून, ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. लॉजिकल रिझनिंग, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि संबंधित शाखेचे तांत्रिक ज्ञान या विषयांसंबंधित प्रश्न विचरले जातील. तसेच अर्ज करता उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, या संबंधित चाचणीही घेण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी पात्र होण्यास उमेदवारांना नियुक्तीच्या या टप्प्यांना पात्र होणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करायचा?
पात्रता:
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकषांना पूर्ण करावे लागणार आहे. अर्ज करताच उमेदवार किमान 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवीधारक आवश्यक आहे. किंवा किमान 65% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडं काही काळाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. डिप्लोमा धारकांसाठी किमान 2 वर्षांचा अनुभव निश्चित करण्यात आला आहे. पदवीधारकांसाठी 1 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. अधिसूचनेमध्ये नमूद वयोमर्यादेनुसार, किमान वय २० निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरत्सीठी अर्ज करता येणार आहे. नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
जास्त माहितीकरिता RBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.