फोटो सौजन्य - Social Media
जुन्या EV गाड्यांवर १८% GST लागू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर या संदर्भात अनेक पोस्ट व्हायरल झाले आहेत. तसेच लोकनाच्या चर्चेत येत आहेत. एकंदरीत, समजा एखादी गाडी ६ लाखांमध्ये विकत घेतली आणि काही वर्ष वापरून तिला १ लाखांच्या रक्कमेत विकून दिली. यामध्ये रक्ममेच्या ५ लाखांच्या अंतरावर १८ % GST द्यावी लागणार आहे. म्हणजेच ५ लाखांवर १८% GST एकूण ९०,००० रक्कम टॅक्स लागू होईल. अशा पद्धतीचे अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, नेमकं काय आहे हे प्रकरण?
मुळात, सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये गैरसमज तयार झाला आहे. मुख्य म्हणजे निर्मला सीतारामन यांनी सांगितले कि पुनर्विक्रीमध्ये असणाऱ्या गाड्यांच्या मार्जिन व्हॅल्यूवर टॅक्स लावला जाईल. पण लोकांना असे कळून आले कि विक्री करणाऱ्या गाडीच्या मालकाला हा टॅक्स द्यावा लागेल. मुळात, हे टॅक्स बिजनेस व्हेंचरने द्यायचे आहे, पर्सनल सेलरने नव्हे.
शनिवारी, ५५ वी GST बैठक आयोजित करण्यात आली होती. पॅनलमध्ये यूज्ड ईवीवर लागणाऱ्या GST टॅक्सला १२% हून १८% वर वाढवण्यात आले आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा मुद्द्दा या बैठकीत समजवला होता. उदाहरणार्थ, एक कार १२ लाखांमध्ये खरेदी केली गेली आणि ती पुढे ९ लेखनाच्या दरामध्ये विकली तर त्यामधील रक्कमेच्या अंतरावर GST लागू करण्यात येईल. मुळात, या विषयाने लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केलं आहे. लोकांना प्रश्न आहे कि ते त्यांच्या गाड्या उलट तोटा करून विकत आहेत तर त्यावर GST का? पण हे टॅक्स १८% असून प्रॉफिट मार्जिनवर द्यायचे आहे.
उदाहरणार्थ, जर कुणी एखादा डीलर ९ लाख रुपयांमध्ये एखादी EV खरेदी करतो आणि १० लाख रकमेत विकतो. तर यामध्ये त्याला १ लाखाचा नफा होतोय. या होणाऱ्या नफावर १८% GST आकारण्यात येणार आहे. परंतु, जर गाडीची खरेदी ९ लाखात केली असेल आणि ६ लाखात गाडी विकली जात आहे तर कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारण्यात येणार नाही आहे. टॅक्स प्रॉफिट मार्जिन वर आकारण्यात येणार आहे. मुळात, पेट्रोल, डिझेल आणि EV या संज्ञा प्रकारच्या यूज्ड गाड्यांसाठी हा टॅक्स आकारण्यात येणार आहे.