AMAZON (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये रिक्त जागा जाहीर केल्याचे समोर आले आहे. अमेझॉनने टीम लीडरपदासाठी ही रिक्त जागा जाहीर केली आहे. या पदासाठी निवडलेला उमेदवाराला अनेक जबादारी असणार आहे. कस्टमर फेसिंग एनवायर्नमेंट, वेयरहाउसिंग, लॉजिस्टिक्स किंवा मैन्युफैक्चरिंग मध्ये १ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
भूमिका आणि जबाबदाऱ्या:
उमेदवार हा बॅचलर पदवीधार असेल. त्याकडे कस्टमर फेसिंग एनवायर्नमेंट, वेयरहाउसिंग, लॉजिस्टिक्स आणि मैन्युफैक्चरिंग मध्ये एका पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असणे गरजेचं आहे. चांगले इंग्रजी लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे.मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोडक्ट आणि एप्लिकेशनवर काम करण्याचा अनुभव असावा. एक्सेलमध्ये काम करण्याचा अनुभव असावा. Amazon च्या टीम लीडरचा सरासरी वार्षिक पगार ६.९ लाख रुपयांपर्यंत असू शकतो. या पदासाठी नौकरीचे ठिकाण मध्यप्रदेश येथील भोपाळ आहे.अर्ज करण्यासाठी तुम्ही Apply Now ला क्लीक करून अर्ज करू शकता.
सीबीएसई बोर्डाच्या १०वी-१२वी पुरवणी परीक्षा उद्यापासून; प्रवेशपत्र जारी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १३ मे २०२५ रोजी दहावी आणि बारावीच्या मुख्य बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. बारावीत एकूण १४.९६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीमध्ये २२.२१ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता नवीन सत्राच्या पुरवणी परीक्षेला सुरुवात होणार आहे. चला जाणून घेऊया पुरवणी परीक्षा कधी पासून आहे ?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी आणि १२विच्या पुरवणी परीक्षेला सुरवात होणार आहे. येत्या मंगळवारपासून ही परीक्षा सुरु होणार आहेत. बॉर्डरने वेळापत्रकही जाहीर केले आहे. उमेदवार https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर बघू शकणार. या पुरवणी परिसक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
आता हवेत उडायची वेळ आली ! Emirates Airline मध्ये नोकरी करण्याची हवाई संधी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त