संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) एक नवीन आणि मोठा उपक्रम हाती घेतला आहे. ही इंटर्नशिप पेड राहणार आहे. या इंटर्नशिप अंतर्गत एकूण 165इंटर्न निवडले जातील. जर तुम्ही अंडर ग्रेजुएट (अभियांत्रिकी) किंवा पदव्युत्तर (इंजीनियरिंग / फिजिकल साइंस) विद्यार्थी असाल तर तुम्ही DRDO च्या या पेड इंटर्नशिपमध्ये सामील होऊ शकता. चला जाणून घेऊया या इंटर्नशिप बद्दलची अधिक माहिती.
आता हवेत उडायची वेळ आली ! Emirates Airline मध्ये नोकरी करण्याची हवाई संधी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) अंडर ग्रेजुएट (इंजीनियरिंग) आणि पोस्ट ग्रेजुएट (इंजीनियरिंग / फिजिकल साइंस) विषयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिप जाहीर केली आहे. या इंटर्नशीप अंतर्गत एकूण 165 इंटर्न निवडले जातील. या इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिने निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी DRDOच्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in ला भेट देऊ शकता.
कोण करू शकतो अर्ज ?
या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून इंजीनियरिंग पदवी किंवा इंजीनियरिंग / फिजिकल साइंस पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असावा. तसेच, उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे हे पात्रता निकष आहे.
इंटर्नशिपचा कालावधी किती?
इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिने निश्चित करण्यात आला आहे. इंटर्नशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर, डीआरडीओकडून प्रमाणपत्र देखील प्रदान केले जाईल.
निवड प्रक्रिया काय?
उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी (इंजीनियरिंग) आणि पोस्ट ग्रेजुएट (इंजीनियरिंग/फिजिकल साइंस) अंतिम वर्षाचा विद्यार्थी असावा. याशिवाय, विद्यार्थ्याचा AICTE किंवा UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून 60 टक्के गुणांसह चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असावा. तसेच, मुलाखत आणि संपूर्ण सेमिस्टर/वर्षात मिळालेल्या गुणांच्या किंवा CGPA टक्केवारीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाऊ शकते.
स्टायपेंड किती?
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) द्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड प्रदान केले जाणार. हे स्टायपेंड फक्त अशा विद्यार्थ्यांना दिले जाईल ज्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला आहे आणि जे इंटर्नशिप दरम्यान किमान १५ दिवस उपस्थित असेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 आहे. २६ जुलै २०२५ ला इंटरव्यू घेण्यात येणार आहे. इंटरव्यूमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला 01 ऑगस्टपासून डीआरडीओच्या या इंटर्नशिप कार्यक्रमात सामील होऊ शकतील.