रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ०१ एप्रिल २०२४ रोजी आपल्या ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या विशेष वर्षानिमित्त, आरबीआयने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतातील नोंदणीकृत ललित कला महाविद्यालयांसाठी एक कला स्पर्धा आयोजित केली. “RBI@90” या थीमखालील या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयातून एक पदवीपूर्व विद्यार्थी आपली कलाकृती सादर करू शकणार होता.
हे देखील वाचा : झेल एज्युकेशनतर्फे विशेष गोलमेज परिषद संपन्र ! फायनान्स एज्युकेशनच्या भविष्याबाबत करण्यात आली चर्चा
२२ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी दिल्लीत आयोजित या स्पर्धेत ७१ कलाकृतींपैकी १५ उत्कृष्ट कलाकृतींची अंतिम निवड झाली. प्रत्येक विजेत्या विद्यार्थ्यासाठी १ लाख रुपये रोख आणि त्यांच्या संस्थेसाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी दिल्लीच्या आरबीआय कार्यालयात या कलाकृतींचे प्रदर्शन आणि मूल्यांकन करण्यात आले.
विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधील तृतीय वर्षाचा विद्यार्थी निखिल मांगेला याच्या कलाकृतीने या स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले. त्याला १ लाख रुपये रोख व संस्थेसाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर प्रदान करण्यात आला. निखिल हा महाराष्ट्राचा निवासी आहे. पालघर जिल्ह्यातील मंगेलवाड येथे स्थित असलेले झाई गावामध्ये त्याचे वास्तव्य आहे. त्याने या स्पर्ध्येत बाजी मारली असून, तो विवा इन्स्टिट्यूटमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी ओळखला गेला.
हे देखील वाचा : SSC CGL Tier I 2024 चा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता ! जाणून घ्या या निकालासंबंधी महत्वाच्या बाबी
सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सुरळीतपणे ही स्पर्धा पार पडली. सर्व सहभागी विद्यार्थी प्राध्यापक आणि पालक यांची व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे नवी दिल्लीत करण्यात आली होती. सर्व नियोजन अगदी चोख करण्यात आले होते. सर्व निवडण्यात आलेल्या कलाकृती हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मालमत्ता असून त्यासंबंधीत अधिकार बँक कडे असतील असे कार्यक्रमावेळी सूचित करण्यात आले. तसेच या कलाकृतींचे कॉपीराईटही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मालमत्ता असल्याचे सूचित केले गेले. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले. तसेच या दरम्यान व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धकांना त्यांनी संबोधित केले तसेच त्यांचे मार्गदर्शन केले.