नॅशनल सेक्युरिटी कमांडो म्हणजेच ब्लॅक कॅट कमांडो त्यांच्या वर्दीमुळे प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक तरुण या फोर्समध्ये भरती होऊ इच्छुक आहेत. पण भरती व्हायचे कसे? याबद्दल अनेक जणांना प्रश्न आहे. महत्वाची बाब म्हणजे NSG मध्ये सामान्य उमेदवारांना भरती होता येत नाही. त्यांना नियुक्ती मिळवता येत नाही. NSG मुख्यतः त्या उमेदवारांची नियुक्ती करते, ज्यांनी भारतीय सुरक्षा दलांमध्ये भूमिका बजावली आहे. युनिट भारतीय लष्कर (Army), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधून उमेदवारांची नियुक्ती करते.
या भरतीसाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागतील. हे निकष उमेदवारांच्या भरती संदर्भात आहेत. उमेदवार सध्या भारतीय लष्कर किंवा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये सेवेत असावा. उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३५ वर्षे असावे तसेच उमेदवाराकडे किमान ३ ते ५ वर्षांचा लष्करी अनुभव असणे अनिवार्य आहे. काही टप्प्यांच्या माध्यमातून लष्करी उमेदवाराची नियुक्ती करण्यात येते. यामध्ये शारीरिक फिटनेस चाचणी घेण्यात येते. उमेदवाराला मानसिक क्षमता संबंधित चाचणी उत्तीर्ण करावी लागते. मुलाखत तसेच वैद्यकीय चाचणी पात्र करत उमेदवार NSG मध्ये नियुक्ती देण्यात येते.
नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीचे काही ९० दिवस उमेदवाराला खडतर ट्रेनिंगसाठी तयार व्हावे लागते. त्यामध्ये अँटी-हायजॅकिंग, अर्बन वॉरफेअर, हाउस इंटरव्हेन्शन, स्नायपर ट्रेनिंग, बॉम्ब डिफ्युझल यासारखे कौशल्य शिकवले जातात. महत्वाचे म्हणजे NSG मध्ये ब्लॅक कॅट असणे एक अभिमानाची बाब आहे. याचे काही महत्वाचे फायदे आहेत, चला तर मग जाणून घेऊयात: ही एक अत्यंत सन्मानाची नोकरी आहे. यामध्ये उच्च वेतन आणि भत्ते मिळते. देशासाठी थेट सेवा करण्याची संधी पदरात येते. उच्च दर्जाची ट्रेनिंग आणि कौशल्य देण्यात येतात.