
फोटो सौजन्य - Social Media
AIIMS मध्ये प्रवेश मिळवणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, पण त्यासाठीची तयारी अत्यंत नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि स्मार्ट असणे गरजेचे आहे. देशातील सर्वात अवघड आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेसाठी NEET-UG हा मुख्य मार्ग असल्याने तयारीही त्याच पॅटर्ननुसार करणे आवश्यक ठरते. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांसाठी NCERT हेच मूळ शस्त्र आहे.
विशेषतः बायोलॉजीमध्ये 80 ते 85 टक्के प्रश्न थेट किंवा अप्रत्यक्षरित्या NCERTवर आधारित असतात, त्यामुळे बायोलॉजीचे दोन्ही भाग शब्दशः वाचून, महत्वाच्या ओळी अधोरेखित करून आणि वारंवार पुनरावलोकन करून पक्के करणे अत्यावश्यक असते. केमिस्ट्रीमध्ये पिरियडिक टेबल, प्रॉपर्टीज, ऑर्गेनिकचे बेसिक मेकॅनिझम आणि इनऑर्गेनिकचे चार्ट हे NCERTवरूनच मजबूत होतात, तर फिजिक्समध्ये संकल्पना नीट समजून घेऊन high-quality notes आणि उदाहरणांचा अभ्यास करण्यावर भर द्यावा लागतो. अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर पुढचा निर्णय म्हणजे कोणती पुस्तके वापरायची—फिजिक्ससाठी HC Verma आणि DC Pandey, केमिस्ट्रीसाठी OP Tandon, Himanshu Pandey आणि NCERT Exemplar तर बायोलॉजीसाठी MTG Fingertips आणि पिछल्या वर्षांच्या प्रश्नसंचांचा अभ्यास खूप उपयुक्त ठरतो. या पुस्तकांतून दररोज mixed MCQ Practice केली तर वेग, accuracy आणि concept clarity तिन्ही आपोआप सुधारतात.
अभ्यासाचा वेळ नीट व्यवस्थापित करण्यासाठी 3–4 महिन्यांचे छोटे टप्पे ठेवून त्यानुसार planning केल्यास मोठ्या syllabus वर नियंत्रण ठेवणे सोपं जातं. दिवसातील वेळेचं साधं गणित असं असू शकतं—60% वेळ संकल्पना आणि अध्ययन, 25% वेळ MCQ सराव आणि 15% वेळ फक्त पुनरावलोकन. त्यानुसार रोज कमीत कमी 2–3 तास बायोलॉजी, 1.5 तास केमिस्ट्री आणि 1.5 तास फिजिक्सला दिले, तर एक मजबूत बेस तयार होतो. यासोबत टेस्ट सिरीज ही तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग मानली जाते. आठवड्यातून एक फुल-लेंथ टेस्ट दिल्यास वास्तविक परीक्षा परिस्थितीचा अनुभव मिळतो, वेळेचे नियोजन सुधारते आणि चुका कुठे होत आहेत याचा अचूक अंदाज येतो. या चुकांसाठी स्वतंत्र “analysis notebook” ठेवली, तर पुढील टेस्टमध्ये त्या चुका पुनरावृत्ती होत नाहीत. AIIMS किंवा NEETमध्ये यशस्वी होण्यासाठी बायोलॉजी हा 50% यशाचा मंत्र आहे—Human Physiology, Genetics, Ecology आणि Plant Physiology या विभागांवर खास भर दिल्यास स्कोर सहज वाढतो. डायग्राम्स, टेबल्स आणि keywords हे दररोज पुनरावलोकनात ठेवणे फायदेशीर ठरते. तयारी जितकी महत्वाची तितकीच महत्वाची आहे Revision—आठवड्यात एक दिवस पूर्णपणे पुनरावलोकनासाठी ठेवल्यास विस्मरण दूर राहते.
परीक्षेच्या शेवटच्या 30 दिवसांत फक्त mock tests आणि revision यावर भर दिल्यास performance लक्षणीय सुधारतो. याबरोबर मानसिक स्थिरता आणि सातत्य राखणेही अत्यंत गरजेचे आहे—झोप कमी झाल्यास, स्क्रीन टाइम वाढल्यास किंवा मन सतत विचलित झाल्यास अभ्यासावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे सोशल मीडिया नियंत्रणात ठेवणे, पुरेशी झोप घेणे, थोडा व्यायाम करणे आणि मन प्रसन्न ठेवणेही तयारीइतकेच महत्वाचे आहे. अनेकांना प्रश्न पडतो की कोचिंग आवश्यक आहे का? कोचिंग निश्चितच मदत करते, परंतु ते अनिवार्य नाही. चांगले notes, NCERT, नियमित टेस्ट सिरीज आणि self-discipline असेल तर घरच्या अभ्यासानेही AIIMS मिळवता येतो. अखेरीस, AIIMS साठी तयारी म्हणजे सतत शिकण्याची इच्छा, योग्य दिशा, नियोजनबद्ध व स्मार्ट अभ्यास आणि नियमित चाचण्यांचा प्रभावी वापर—ही चार सूत्रे पाळली, तर AIIMSमध्ये प्रवेश हे स्वप्न नव्हे तर वास्तव बनू शकते.