फोटो सौजन्य - Social Media
राज्यभरात विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलेला नियमित प्रश्न असतो तो म्हणजे विद्यार्थ्यांचे खांद्यावरचे वजन केव्हा कमी होणार? दरवर्षी असा प्रश्न पालकांद्वारे केला जातो. शासनदेखील याबद्दल नियमित हालचाली करण्यास प्रयत्नशील असते. काही मुले तर आपल्या वजनापेक्षा जास्त अभ्यासाचे वजन पाठीवर घेऊन फिरतात. जास्त भार उचल्याने कधी कधी त्रास किंवा दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामध्ये शासनाचा नवा निर्णय आला आहे. याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भार तर पडणारच आहे. पर्णातू, त्याचबरोबर त्यांच्या पाठीवरील वजनामध्ये देखील वाढ होणार आहे.
हे देखील वाचा : मुंबईत RRB ची बंपर भरती; २० ऑक्टोबरपर्यंत करता येईल अर्ज
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा निर्णयजाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत, नववी तसेच दहावीसाठी विद्यार्थी जास्तीत जास्त ७ ते ८ विषय अभ्यासत होते. परंतु, आता यामध्ये वाढ झाली आहे. आता नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना जास्त विषय अभ्यासावे लागणार आहेत. वाढते विषय शाळेच्या वेळेच्या वाढीलाही कारणीभूत ठरण्याची अफाट शक्यता आहे. नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात आता आणखीन काही नव्या विषयांची भर पडून, विद्यार्थ्यांना आता १५ विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे.
यामध्ये विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र तसेच शारीरिक शिक्षणसारख्या विषयांचा समावेश तर आहेच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तीन भाषांचे शिक्षण दिले जाणार आहे. या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीय मुळाच्या असणार आहरेत. महत्वाची बाब अशी आहे कि, कालपर्यंत विद्यार्थ्यांना स्काऊट तसेच गाईडसारखे विषय ऑप्शनल होते. परंतु, जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, विद्यार्थ्यांना हे विषय आता बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्काऊट तसेच गाईडसारख्या विषयांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.
हे देखील वाचा : आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज
नवीन शैक्षणिक धोरणांच्या अनुसार हा बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नववीच्या विद्यार्थ्यांना आता शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य या व्यवसायांबद्दल शिकवले जाईल. तर १० वीच्या विद्यार्थ्यांना बागकाम, सुतारकाम, परिचर्याच्या कामांची ओळख करून देण्यात येणार आहे. एकंदरीत, NEP विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीवर भर देत आहे. तसेच विद्यार्थ्यांना कला क्षेत्रामध्ये पारंगत करण्यावर भर देण्यात येणार आहे. एकंदरीत, या विषयांमध्ये तीन भाषा तर सात मुख्य विषय असणार आहेत. गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान, संगणक शास्त्र, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण असे विषय असतील.