Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात

देशात लागू राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP)नुसार महाराष्ट्रात २०२६-२७ पासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीपासून बदलांची सुरुवात होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

देशात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP)नुसार आता महाराष्ट्रातही नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी केली जाणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून या बदलांची सुरुवात होणार असून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीपासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी

पुढील वर्षांत टप्प्याटप्प्याने इतर वर्गांनाही हा अभ्यासक्रम लागू केला जाईल. नवीन अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांना सहज जुळवून घेता यावे यासाठी ‘सेतू अभ्यासपुस्तिका’ही तयार केली जात आहे. या पुस्तिकेद्वारे विद्यार्थ्यांना खेळकर आणि कौशल्याधारित पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठीही या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या माध्यमातून ही सेतू पुस्तिका तयार केली जात असून पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम बालभारतीमार्फत केले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरावर अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. नवीन धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेची रचना आधीच बदलण्यात आली आहे. त्यानुसार केजी ते दुसरीपर्यंत पूर्वप्राथमिक, तिसरी ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी माध्यमिक आणि नववी ते बारावी उच्च माध्यमिक स्तर असे विभाजन करण्यात आले आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे.

IBPS Clerk Exam: जिल्हा बँकेत सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया; वाचा सविस्तर  

अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा आराखडा देखील निश्चित करण्यात आला आहे. २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी; २०२७-२८ मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी; तर २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावीमध्ये नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. नवीन अभ्यासक्रमात अनुभवाधारित, सर्वसमावेशक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच संख्याज्ञान, सर्जनशीलता आणि स्थानिक गरजांनुसार विषयवस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, कौशल्याधारित आणि भविष्योन्मुख होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Curriculum to change as per nep textbook will be changed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • education news
  • NEP

संबंधित बातम्या

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही
1

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.