फोटो सौजन्य - Social Media
आता स्पर्ध्येचे युग आहे. प्रत्येकाला हवे तसे मिळणे फार कठीण आहे. स्पर्धा आणि स्पर्ध्येचे युग काय असते? या गोष्टी खरं तर खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला विचारले पाहिजे. त्यांना या गोष्टीचे उत्तर बरोबर ठाऊक असते. अशा परिस्थितीत हवी तशी नोकरी तर मिळतात नाही, त्याचबरोबर हवा तसा पगारही मिळत नाही. तर याच उद्देशाने खाजगी क्षेत्रामध्ये जीव ओतून काम करणारे व्यक्ती उत्तर पगाराच्या शोधात दहा वेळा नोकरी बदलत असतात. करिअर ग्रोथचा शोधामध्ये या गोष्टीचा परिणाम कसा काय करिअर होतो? या गोष्टी कळूनही येत नाही. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मुलाखत देण्यासाठी जाता आणि तुम्हाला कळवण्यात येईल असे सांगून अनेक दिवस होतात परंतु HR कॉल काय मेसेजही साधा येत नाही, तर समजून जा कि तुम्हीदेखील हीच चूक करत आहात.
हे देखील वाचा : कॅनडाने स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम व्हिसा कार्यक्रम केला बंद; भारतीय विद्यार्थ्यांना बसणार मोठा फटका
जॉब हॉपिंग म्हणजे भाराभार अपेक्षा. चांगला पगार आणि चांगल्या गोष्टींच्या शोधात एका ठिकाणी साधा वर्षही न टिकता दहा वेळा बदललेले कामाचे ठिकाण या कृतीला जॉब हॉपिंग बोलतात. जर तुम्ही एका कामाच्या ठिकाणी जाता आणि सहा महिन्यांपासून जास्तीत जास्त २ वर्षांच्या आत त्या ठिकाणावरून दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट होता आणि असे करतच राहता तर तुम्हाला जॉब हॉपिंग कॅटेगरीतला एम्प्लॉयी म्हंटले जाते. आपल्या नावासमोर असलेला हा शिक्का मोर्तब आपल्या नावाची प्रतिष्ठा वाढवत नसून, आहे त्या प्रतिष्ठेलाही आणखीन खाली पाडत आहे. जर तुम्हालाही जॉब हॉपिंग करण्याची सवय आहे, तर आताच ते टाळा. कारण अनेक मोठमोठ्या कंपन्या अशा नोकरवर्गाला संधी देण्यापासून वाचतात.
मोठमोठ्या कंपन्या अशा नोकरी पेशावरांना कामावर ठेवण्यापासून वाचतात. कंपनी म्हणते कि जॉब हॉपिंग करणारे व्यक्ती रेड फ्लॅग असतात. या लोकांना काम करणे जमत नाही. टीममध्ये काम करता येत नाही. अशा अनेक कारणांमुळे यांना संधी देण्यापासून कंपनी वाचते. त्यांच्या अशा बदलामुळे आणि कामामुळे कंपनीचा नाव खराब तर होतो.
हे देखील वाचा : NMDC मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज
त्याचबरोबर कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम होतो. linkdin वर करण्यात आलेल्या संशोधनात समोर आले आहे कि, अनेक कंपनीचे मॅनेजर म्हणतात कि ९ महिन्यांच्या आत काम करणारे उमेदवार यांचे रिज्युमे पुढे पाठवले जात नाही. जास्त करून मिलेनिअन्स आणि Generation Z या पिढीतील उमेदवारांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आढळून येतात.