फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन (NMDC)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये Junior Officers (Trainee) पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विविध विभागांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजली जाणार आहे. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये या भरतीच्या संदर्भात सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. एका ठराविक तारखेपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. १० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करायचे आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात किंवा अर्ज करण्याचे राहून गेले आहे तर आजच या भरतीचा फायदा घ्या. परीक्षेची तारीख अद्याप ठरवण्यात आली नाही आहे. काही दिवसांमध्ये ती जाहीर करण्यात येईल.
हे देखील वाचा : अशा प्रकारे करा UPSC ची तयारी; स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी महत्वाच्या टिप्स
NMDC JOT Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत आहे. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील या भरतीसाठी २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PWD, ESM, Deptt. प्रवर्गातून येणारे उमेदवार अगदी मोफत अर्ज करू शकतात. ऑनलाईन स्वरूपात अर्ज शुल्क भरायचे आहे, तसेच अर्जही ऑनलाईन करायचे आहे.
या भरतीच्या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी काही अटी शर्ती देण्यात आल्या आहेत. या अटी शर्ती अर्ज कर्त्या उमेदवाराच्या वयासबंधित आहेत. तसेच काही शैक्षणिक अटींना उमेदवारांना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती पात्र करणाऱ्या उमेदवारांनाच या भर्तीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादे संदर्भात असलेल्या अटीनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण १५३ रिक्त पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. विविध विभागातून ही भरती असल्याने, उमेदवार साबणाधित क्षेत्रामध्ये पदवीधर असणे अनिवार्य आहे.
हे देखील वाचा : बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; लाखोंच्या घरात मिळेल वेतन
निवड प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. चार टप्प्यांमध्ये उमेदवारांना नियुक्तीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. अद्याप तारखा जाहीर नाही. यांनतर उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेण्यात येईल. दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीसह नियुक्तीच्या प्रक्रियेची समाप्ती होईल. या चार टप्प्यांमध्ये पात्र उमेदवारांना नियुक्तीस पात्र होता येणार आहे.