Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मुंबई BMW हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला आज मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ३० जुलैपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. या हिट अँड रन प्रकरणात वरळी येथील कावेरी नाखवांचा मुत्यू झाला होता.

  • By नारायण परब
Updated On: Jul 16, 2024 | 06:54 PM
photo credit: social media

photo credit: social media

Follow Us
Close
Follow Us:

Worli Hit and run:  मुंबई BMW हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला आज मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाहने चालविलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने वरळी येथील ४० वर्षीय कावेरी नाखवांचा मृत्यू झाला, ही घटना ७ जुलै रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास वरळीच्या धमनी अन्नी बेझंट रोड येथे घडली.

बीएमडब्ल्यू हिट अँड रनच्या घटनेनंतर मिहिर शाह हा फरार झाला होता. दोन दिवसांनंतर पालघर जिल्ह्यातील विरार येथून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मुख्य महानगर दंडाधिकारी (शिवडी न्यायालय) एस पी भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज मंगळवार, १६ जुलै रोजी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे ३० जुलैपर्यंत मिहिर न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

अपघात प्रकरण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी नाखवाला भरधाव कारने सुमारे 1.5 किमीपर्यंत खेचले होते. त्यानंतर मिहीरने त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावतसोबत जागा बदलली आणि तो दुसऱ्या वाहनात पळून गेला.मिहीर शाहवर भारतीय न्याय संहिता कलम १०५  सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मिहीरचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेा शिंदे गटाचे कार्यकर्ते होते. त्यांनी अपघातानंतर मिहिरला मदत करण्याचे प्रयत्न केले होते. अपघातानंतर आरोपी मुलाला मदत केल्याप्रकरणी राजेश शहाला अटक करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने कारवाई करत त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरूनही हकालपट्टी केली. या घटनेनंतर चालक राजऋषी बिडावतलाही अटक करण्यात आली . न्यायालयाने ११ जुलै रोजी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Web Title: 14 days judicial custody to mihir shah in worli hit and run case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 06:54 PM

Topics:  

  • mihir shah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.