इंदूर : हनिमूनसाठी इंदूरहून मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशीचा खून त्याच्या पत्नी सोनमनेच केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सोनम आणि तिच्या प्रियकरच राज कुशवाहा यांनीच राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शिलाँगसारख्या दूरच्या ठिकाणी, सुमारे २,००० किमी अंतरावर, सोनमने हा गुन्हा अंमलात आणला.
सोनम आणि राजा यांची ओळख रघुवंशी समाजाच्या अॅपवरून झाली होती. ११ फेब्रुवारीला साखरपुडा आणि ११ मे रोजी लग्न झाले. पण याच काळात सोनमने तिच्या प्रियकरासोबत राजाला हटवण्याचा कट आखला. राजाला मारून विधवा झाल्यावर ती प्रियकरासोबत लग्न करेल, आणि वडीलही मग विरोध करणार नाहीत, असा तिचा प्लॅन होता.
लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांत, १६ मे रोजी सोनमने राज कुशवाहासोबत मिळून अंतिम योजना तयार केली. राजाला हनिमूनसाठी शिलाँगला जाण्यासाठी तिने राजाला तयार केले. याचदरम्यान, गुवाहाटीमध्ये आधीच तीन सुपारीबाज आधीच तैनात करण्यात आले होते. त्यांनी लहान कुऱ्हाड ऑनलाइन ऑर्डर केली होती.
२३ मे रोजी सोनमने फोटोशूटचे निमित्त सांगून राजाला कोरसा परिसरातील टेकडीवर नेले. टेकडी चढताना सोनमने थकण्याचे नाटक करत मागे राहिली. पुढे चालत असलेले तिघे आरोपी थकले आणि त्यांनी राजाला मारण्यास नकार दिला.
त्यावर सोनमने राजाच्या पर्समधील १५,००० रुपये दिले आणि “त्याला मारावंच लागेल” असं स्पष्ट सांगितलं. काम झाल्यावर २० लाख रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते.
Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीत इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी वडिलांनी २ मुलांसह थेट…
मेघालय पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनम राजापासून थोडे अंतरावर उभी राहून फोनवर बोलताना दिसली. कॉल रेकॉर्ड तपासताना प्रियकर व अन्य आरोपींचे तपशील समोर आले. सर्वांचे लोकेशन इंदूरमध्ये सापडल्यावर पोलिसांनी अॅक्शन घेतला.
खून केल्यानंतर सोनमने तिचा फोन तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपी ट्रेनने परतले, तर सोनमने शिलाँगहून वाराणसी व गाझीपूरमार्गे नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकर व इतर आरोपी अटकेत आल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनमने अखेर गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केले.
सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral
सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी आणि भाऊ गोविंद यांचा प्लायवूडचा एक छोटासा कारखाना आहे. सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान असलेला राज त्या कारखान्यात अकाउंटंट म्हणून काम करत होता. सोनम येथे एचआर म्हणून काम करत होती. यामुळे दोघांची भेट झाली आणि जवळीक वाढली. पोलिसांनी सोनम आणि राजाचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा असे आढळून आले की सोनम लग्नापूर्वी आणि नंतर तासनतास राजशी बोलत असे.