शिरोली MIDC भागात भरदिवसा सुमारे पाच लाखांचा ऐवज लुटला; पोलिसांत गुन्हा दाखल
सुंदरगड : ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रेमप्रकरणावरून हाणामारी झाली. ज्यामध्ये तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नंतर पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
हेदेखील वाचा : वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली अन् घरी परतलीच नाही; पालघर जिल्ह्यात स्मशानभूमीजवळ आढळला ७ वर्षांच्या मुलीचा मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरगढ सदर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमागे प्रेमप्रकरण होते. महाराष्ट्रातील अविनाश पवार नावाच्या व्यक्तीचा स्थानिक लोकांशी वाद झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पवार याने दोन लग्न केली होती. यामध्ये त्याला दोन्ही पत्नींकडून मुले आहेत. अविनाशच्या प्रेमप्रकरणावरून स्थानिक लोकांशी असलेला वाद इतका वाढला की, हाणामारी झाली. रात्री अकराच्या सुमारास भटक्या समाजातील लोक झोपले असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
दरम्यान, या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला तर अविनाश आणि अन्य एक महिला जखमी झाली. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि अविनाशची दुसरी पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवले. या घटनेनंतर घटनास्थळी राडा झाला. या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव
आदिवासी समाजातील दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता घटनास्थळी तीन महिला आणि दोन पुरुष मृतावस्थेत आढळून आले. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Pune News: चंदन चोरांवर उपचार करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होणार; आयुक्त अमितेश कुमार