नाशिक: बदलापूर बाल अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमधील सिडको परिसरात राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला आहे. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुलींच्या पालकानी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग झाला. उपेंद्रनगरमधील एका खाजगी ट्युशन सेंटरमधून हा धक्कादायक प्रकार झाला. संबंधित पिडीत मुलगी खासगी क्लासमध्ये एकटीच अभ्यास करत बसली होती. त्यावेळी क्लासमध्ये शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले.
हेदेखील वाचा: गणेश मंडळांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
या प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली. पण दुसऱ्या दिवशी क्लासला जाण्यास तिने नकार दिला. त्यावेळी पिडीत मुलीच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी तिने आईला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीसोबत जो प्रकार घडला ते ऐकल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरूद्ध तक्रार दाखल केली.
याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात 32 वर्षीय शिक्षकाविरूद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता क्लासमधील सर्व पालकांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा: जगभरातील खराब झालेले Satellite पृथीवर कुठे सोडले जातात? जाणून घ्या एका क्लीकवर