(फोटो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ट्विटर )
राज्यात आता गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. प्रत्येकाच्या घरी आतापासूनच काही ना काही तयारी सुरू झाली आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव मंडळे देखील तयारीला लागले आहेत. यावर्षी भक्तांना नवीन देखावे बघयला मिळावेत यासाठी गणेश मंडळे तयारी करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. गणेश मंडळांच्या शेजारी पार्किंगची सोय करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गणेश मंडळांना आरोग्य सुविधा, तसेच अग्निशमन दलाची मदत देखील देण्यात यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. यंदाच्या वर्षी मुंबईत १२ हजारांपेक्षा जास्त गणेश मंडळे असणार आहेत. तसेच मोठ्या गणेश मंडळांना रुग्णवाहिका, डॉक्टर आणि इतर सुविधा पुरविण्याचे आदेश दिले शिंदेंनी दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी गावी म्हणजे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवापूर्वी गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
फोटो- istockphoto
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक कोकणात येत असतात. तसेच आपल्या गावी जातात. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आले आहे. आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झाडाच्या फांद्यांची छाटणी करावी, कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत