पुणे: कौटुंबिक वादातून विवाहितेला भारतात सोडून सासरचे परदेशात निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून, तुझ्या वडीलांनी लग्नात कमी खर्च केला, तुला काही येत नाही, तुला काही शिकवले का नाही, तु जाड आहेस, काळी आहेस म्हणत विवाहितेला संमंतीने तलाक देण्यास दबाव टाकला. तसेच तिला सोडून सासरचे सर्व ऑस्टेलिया येथे पळून गेल्याने विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पती, सासु, आणि नणंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार मार्च 2023 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान घडला. याबाबत एका 36 वर्षीय विवाहितेनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी सासरच्यांनी मुलीच्या वडीलांना लग्नाचा सर्व खर्च करायला लावला. लग्नातनंतर काही दिवसातच तिला शिवीगाळ करून तिला मारहाण सुरू झाली. तुझ्या वडीलांनी लग्नात कमी खर्च केला, पैसे दिले नाही, तुला काही शिकवले नाही, तुला काही येत नाही, तु जाड आहेत, काळी आणि कुरूप आहेस, आमचा मुलगा किती चांगला दिसतो असे म्हणून हिणवले.
तिला अपमानास्पद वागणुक देऊन तिचा शारीरिक व मानसीक छळ केला. लग्नानंतर तिला एकटीला सोडून ते ऑस्ट्रेलियाला पळून गेले. तसेच तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. तिला तुझी पर्सनल डायरी आमच्याकडे आहे, तु संमतीने तलाक दे नाही तर जे त्या डायरीत लिहले आहे ते आम्ही सगळ्यांना सांगू आमची वरपर्यंत ओळख अशी धमकी दिली. तसेच तुला कोणताही खर्च देणार नाही अशी धमकी पतीने आणि सासून दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
१४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त
पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे.
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तोसिम ऊफ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा: Drugs Seized: पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त
सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट
सीमाशुल्क विभागाने (कस्टम) वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला सहा हजार किलो अमली पदार्थाचा साठा नुकताच रांजणगाव एमआयडीसी येथे नष्ट करण्यात आला. एका खासगी कंपनीच्या भट्टीत हा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला. सीमाशुल्क विभागाने वर्षभरात वेगवेगळ्या कारवाई करून अमली पदार्थ तस्करी प्रकरणी १४ गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत २३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सहा हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.