Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: टेकड्यांवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई

शहरातील टेकड्यांवर सायंकाळी आणि मॉर्निंग वॉकसाठी नागरिक, तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर जातात. मात्र, हीच संधी साधून या ठिकाणी हे तिघे नागरिकांची लुटमारी करत होते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 08, 2025 | 04:26 PM
Pune Crime News: टेकड्यांवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहरात टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्यांवर नागरिकांच्या लटुमारीच्या घटनां गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढल्या होत्या. टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. अखेर   नागरिकांची लुटमार लुटमार करणाऱ्य टोळीचा पर्दाफाश डेक्कन पोलिसांना यशस्वीपणे केला आहे. या टोळीकडून चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, विशेष म्हणजे, कोयता घेऊन लुटमारी करणाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

स्वप्नील शिवाजी डोंबे (वय ३२, जनता वसाहत) आणि अनिकेत अनिल स्वामी (वय २५) असून, त्यातल्या एका आरोपी मोंटी उर्फ तेजस खराडे (वय २५) ला पोलिसांनी गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून, आणखी गुन्हे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थिनींचा पाठलाग करून फोटो काढणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक; पोलिसांची चौकशी सुरु

मिळालेल्या माहितीनुसार,  पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, सागर घाडगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील टेकड्यांवर सायंकाळी आणि मॉर्निंग वॉकसाठी नागरिक, तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर जातात. मात्र, हीच संधी साधून या ठिकाणी हे तिघे नागरिकांची लुटमारी करत होते,  दोन दिवसांपूर्वी हनुमान टेकडीवर 17 वर्षांच्या महाविद्यालयीन मुलीला आणि तिच्या मित्राला लुटले होते. त्यानंतर या कारवाईला वेग आला.

गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपींची दुचाकी तपासल्या गेली आणि स्वप्नील डोंबे व अनिकेत स्वामी यांचा संशयीत संपर्क समोर आला. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासात हेही समोर आले की, त्यांच्यावर गेल्या वर्षी हनुमान टेकडीवरील आणखी एक लुटमारी करण्याचा आरोप आहे. डेक्कन पोलिसांकडून दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दोन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत.

Pune Crime: पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

भाचीचा प्रेमविवाह अन् मामा चिडला

दुसरीकडे कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी आहे. भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. महेश ज्योतीराम पाटील असं भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवणाऱ्या मामाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटीलच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन विवाह केला होता. त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले. जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. त्यामुळे हे विष टाकलेलं जेवण कोणाचे पोटात गेलं नाही. मात्र, जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची चांगलीच झटापट झाल्याची चर्चा आहे.  जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Web Title: A gang involved in looting in the hills was exposed a major operation by deccan police nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 04:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.