कोयत्याचे वार, भररस्त्यात खून
बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथील भाजपचे विस्तारक बाबासाहेब आगे यांच्यावर कोयत्याने वार करून भर दिवसा खून केला. सदरील खून करणारा आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला. खून केल्याची कबुली दिल्याने त्या आरोपी विरूध्द पोलीस प्रशासनाने कारवाई केली. ही घटना मंगळवारी (दि.15) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
हातात कोयता घेऊन नारायण शंकर फपाळ हा मंगळवारी दुपारी बायपासवर बाबासाहेब आगे याचा पाठलाग करत होता. आगे जिवाच्या आकांताने पळत पळत माजलगाव बस स्थानकापासून जवळच असलेल्या शाहूनगरकडे गेला. मात्र, तेथे जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर फपाळ याने बाबासाहेब आगे यास गाठले.
त्यानंतर काही कळायच्या आत नारायण फपाळ याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. प्रत्यक्षदर्शीने नुसार, फपाळ याने अगोदर पोटात वार करून नंतर दोन वार डोक्यात केले. या घटनेत बाबासाहेब आगे याचा मृत्यू झाला. हल्लेखोर फपाळ घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ पोलिस ठाण्यात शरण आला. त्याने आगे याचा खून का केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, भर दिवसा रस्त्यावर हत्येच्या थरारक घटनेने माजलगाव शहर हादरले आहे.
मित्रानेच केली मित्राची हत्या
नागपूरमध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्या दोन्ही मित्रांमध्ये कोणतेच भांडण नव्हते कोणतेच वाद नव्हते. इतर कोणते कारणही नव्हते. फक्त मित्र श्रीमंती दाखवत होता, म्हणून त्याचा हेवा वाटत होता. या कारणामुळे 19 वर्षीय मित्राने अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केली. हा प्रकार नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.