Video of absconding accused in Mahadev Munde murder case goes viral
Beed Crime News: बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार संशयित आरोपी गोट्या गीतेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोट्या गीतेने थेट रेल्वे रुळांवर बसून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओत गीतेने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले असून, “माझे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार धरावे,” असा थेट आरोप त्याने केला आहे. त्यामुळे हे प्रकरण नव्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी देखील गोट्या गीतेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या व्हिडिओंमध्ये त्याने धमक्या दिल्या होत्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता आत्महत्येचा इशारा दिल्याने पोलीस प्रशासनासह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पोलीस या व्हिडिओची सत्यता तपासत असून गीतेच्या ठिकाणाही शोधत आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आधीच अनेक धक्कादायक घडामोडी घडलेल्या असताना, गीतेचा हा नवा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हिडिओमध्ये गीते म्हणतो, “वाल्मीक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे, तर बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी बबन गीतेला पोलिसांनी शरण येण्यासाठी भाग पाडावं. माझ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जे आरोप केले आहेत, ते त्वरित थांबवावे. अन्यथा मी आत्महत्या करीन आणि त्यासाठी जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील,” असा स्पष्ट इशारा त्याने दिला आहे.
गोट्या गीतेचे हे वक्तव्य सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्याचे धमकीवजा आणि दहशत पसरवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र, आत्महत्येचा थेट इशारा दिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या व्हिडिओची सत्यता तपासली जात असून गीतेचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, गोट्या गीतेने हा संपूर्ण व्हिडिओ रेल्वे रुळांवर बसून चित्रीत केला असून, त्यात त्याने मोठा भावनिक स्फोट केला आहे. गोट्या गीते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता आत्महत्येचा इशारा दिल्याने त्याच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे. गोट्या गीतेला लवकर अटक होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती
दोन वर्षांपूर्वी २० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथील तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या घटनेला तब्बल २१ महिने उलटल्यानंतरही आजपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. आमदार रोहित पवार यांनीही ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणातील तपासात गेल्या २१ महिन्यांत एकूण आठ तपास अधिकारी बदलण्यात आले, मात्र तरीही तपास ठोसपणे पुढे सरकलेला नाही. आता या प्रकरणात काही महत्वाची अपडेट समोर येत आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी पाच संशयितांची चौकशी सुरू असून, एकूण १० ते १२ जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एका महत्त्वाच्या गुप्त साक्षीदाराचीही चौकशी झाली आहे.