फोटो सौजन्य - X (FanCode)
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा काल फायनलचा सामना पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स हा दमदार फॉर्ममध्ये सध्या आहे. त्याने त्याने आतापर्यंत कमालीच्या खेळी खेळला आहे त्याचबरोबर दोन शतके देखील या स्पर्धेमध्ये झळकावली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनान्सच्या सामन्यांमध्ये देखील त्याने कहर केला आणि पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स हे संघ आमनेसामने आले. जिथे पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मोहम्मद हाफिजच्या संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, एबी डिव्हिलियर्सच्या दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने सामना ९ गडी राखून जिंकला आणि ट्रॉफीही जिंकली.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तान प्रथम फलंदाजीला आला आणि सलामीवीर शरजील खानने ७६ धावांची शानदार खेळी केली. मात्र, कामरान अकमल फक्त २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मोहम्मद हाफिजने १७ धावा केल्या तर शोएब मलिकने फक्त २० धावा केल्या. शेवटी उमर अमीनने ३६ धावा केल्या तर आसिफ अलीने २८ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ १९५ धावांपर्यंत पोहोचू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून हार्डस विल्जोएन आणि वेन पार्नेलने प्रत्येकी २-२ बळी घेतले. ड्वेन ऑलिव्हियरनेही १ बळी घेतला.
Ab de Villiers = Champion 👏❤️ @ABdeVilliers17 #worldchampionshipoflegends #WCL2025 pic.twitter.com/pzqSoFYWdo
— World Championship Of Legends (@WclLeague) August 2, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम अमलाने १८ धावा केल्या. त्याचा सहकारी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने ६० चेंडूत १२० धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेपी ड्युमिनीने २८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामना तसेच स्पर्धा जिंकली.
CELEBRATION BY AB DE VILLIERS WITH WCL TROPHY 🥹❤️ pic.twitter.com/iiv2zXUh8m
— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2025
पाकिस्तानचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. दुसरीकडे, आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे.भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये न खेळल्यामुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले. भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे टीम इंडीया उपांत्य फेरीमधुन बाहेर झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता.