Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखाअधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप

महादेववाडी तलाठी कार्यालय येथे केलेल्या पडताळणीत तिघांनी पंचासमक्ष सुरुवातीला २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2024 | 08:35 PM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखाअधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखाअधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: बेहिशेबी मालमत्ता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन लेखाअधिकारी किशोर शिंगे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा ५६ लाख४० हजार २६४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणी किशोर बाबुराव शिंगे, त्यांची पत्नी भाग्यश्री किशोर शिंगे यांच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माधुरी भोसले यांनी तक्रार दिली आहे.

शिंगे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत लेखाधिकारी म्हणून नोकरीस होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. त्यांनी सेवा कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळविले होते. बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. उत्पन्नबाबत शिंगे दाम्पत्य समाधानकारक खुलासा करुन शकले नाही. ज्ञात उत्पन्नपेक्षा शिंगे यांनी ५६ लाख ४० लाख २६४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

२४ हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला अटक

मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा देण्यासाठी २४ हजाराची लाच घेताना पेठ (ता. वाळवा) येथील मंडल अधिकारी मल्हारी शंकर कारंडे (वय ४९), महादेववाडीच्या तलाठी सोनाली कृष्णाजी पाटील, (वय ३५), कोतवाल हणमंत यशवंत गोसावी या तिघांना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

महादेववाडी परिसरातील तक्रारदार यांच्या आजोबानी तक्रारदार यांचे वडील व्यसनी असल्याने त्यांची मौजे महादेववाडी (ता. वाळवा) येथील वडिलोपार्जित जमीन त्यांच्या आईच्या नावाने केली होती. त्यासाठी २००४ मध्ये मृत्युपत्र करून ठेवले होते. २००९ मध्ये तक्रारदार यांचे आजोबा मृत झाले होते. तक्रारदार यांनी सुमारे आठ ते नऊ महिन्यापूर्वी तलाठी सोनाली पाटील यांच्याकडे मृत्युपत्राची नोंद होण्यासाठी आईच्या नावाचा अर्ज दिला होता.

हॉटेलमध्ये लावला सापळा

महादेववाडी तलाठी कार्यालय येथे केलेल्या पडताळणीत तिघांनी पंचासमक्ष सुरुवातीला २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तेव्हा तलाठी सोनाली पाटील यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोरील हॉटेल आण्णा बुट्टेमध्ये तक्रारदार यांच्याकडून २४ हजार रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Web Title: Acb action aganist pcmc accountant and his wife for illegal assets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 08:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.