Ambadas Danve claims something bad happened to Krishna Andhale accused in Beed murder case
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील अनेक रहस्यमयी खुनांची प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहेत. काही दिवसांपूर्वी परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. महादेव मुंडे यांच्या हत्येलाप्रकरणीही वाल्मिक कराडवर आरोप होऊ लागले. हा विषय अजून तापलेलाच असताना, काल आणखी एका संशयास्पद मृत्यूबाबत गंभीर माहिती समोर आली आहे. बीड शहरातील सौरभ भोंडवे या तरूणाचा दिड वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. आता सौरभ भोंडवेच्या हत्येचे प्रकरणही समोर आल्याने बीड शहरातील गूढ हत्या प्रकरणे उजेडात येऊ लागली आहे. इतकेच नव्हेतर आणखी असे किती खून झाले असावेत, असाही सवाल स्थानिक जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.
बीड शहरातील सौरभ भोंडवे या तरुणाचा दीड वर्षांपूर्वी झालेला संशयास्पद मृत्यू झाला. पण अपघात नसून खूनच असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. महादेव मुंडेप्रमाणेच या प्रकरणातही वाल्मिक कराड याचे कनेक्शन असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.
Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय;
सौरभच्या मृत्यूबाबतची घटनाक्रम:
सौरभच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर खूनाचा आरोप केला आहे. गोरख आघाव, संभाजी जायभये आणि सागर जाधव यांनी सौरभचा खून करून त्याचा मृतदेह तलावात फेकल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप करत वाल्मिक कराडने दबाव टाकल्यामुळे गुन्हा दाखल न झाल्याचे सांगितले आहे.
Paytm Tips: QR कोडला होम स्क्रीनवर कसे ॲड करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि आता सौरभ भोंडवे या प्रकरणांमध्ये समान धागा म्हणजे वाल्मिक कराड याचे कथित गुन्हेगारी संबंध. बीडमधील या खुनांची साखळी किती मोठी आहे आणि या जमिनीत आणखी कोणती रहस्ये दडली आहेत, याचा तपास होणे अत्यावश्यक असल्याची मागणी बीडमधून होऊ लागली आहे.